क्राईम जगत

रायपूर हद्दितून शाळकरी मुलगी किडनॅप

रायपूर,(प्रतिनिधी) :

शाळेत गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला अज्ञाताने किडनॅप केल्याची खळबळजनक घटना नुकतीच रायपूर पोलीस स्टेशन हद्दित समोर आली. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन रायपूर पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरु आहे.रायपूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका खेडेगावात आपल्या आई-वडिलांसोबत वास्तव्यास असलेली पीडिता इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत आहे. २६ डिसेंबर रोजी सकाळी पीडिता नेमहमीप्रमाणे आपल्या आई-वडिलांना शाळेत जात असल्याचे सांगुन घरातून बाहेर पडली. परंतु उशरापर्यंत ती घरी परत आलीच नाही. कुटुंबियांनी तीचा नातेवाईकांकडे तसेच मैत्रिनींकडे तीचा शोध घेतला. मात्र, ती कुठेच मिळून आली नाही. दरम्यान, पीडितेच्या आईने रायपूर पोलीस स्टेशन गाठून आपल्या मुलीला अज्ञाताने फुस लावून पळवून नेल्याची फिर्याद दिली. पोलिसांनी सदर घटना गांभीर्याने घेत या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच तपासचक्रे फिरवायला सुरुवात केली असून पीडितेचा शोध सुरु आहे. गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी ठाणेदार दुर्गेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार कैलास खार्डे, अझरूद्दीन काझी हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *