१८ वर्षांपूर्वीच्या ठशांमुळे पटली मृतदेहाची ओळख
धाड,(प्रतिनिधी) :
डिसेंबर २०२४ मध्ये म्हसला बुद्रूक हद्दित आढळून आलेल्या अनोखळखी इसमाची ओळख पटविण्यात तब्बल दोन वर्षांनंतर पोलिसांना यश आले. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनात सुरु असलेल्या ‘अनोळखी मृतदेहांची ओळख पटविणे’ या विशेष मोहिमेचे हे यश असून तब्बल १८ वर्षांपूर्वीच्या एका गुन्ह्यात घेतलेल्या फिंगर प्रिंटमुळे ही ओळख पटली असून सदर प्रकरणाचा उलगडा झाला.
धाड पोलीस स्टेशन हद्दित येणाऱ्या म्हसला बुद्रूक येथे १९ डिसेंबर २०२४ रोजी एका ४० वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला होता. म्हसला बुद्रूक गावाचे पोलीस पाटील रामेश्वर भोंडे यांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीवरून धाड पोलिसांत मर्ग दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी मृतदेहाचे वर्णन आणि कपड्यांवरून शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु प्राथमिक तपासात यश येत नव्हते. दरम्यान, पोलिसांनी मृतदेहाचे फिंगर प्रिंट घेऊन फिंगर प्रिंट ब्युरो यांच्याकडे तपासासाठी पाठवले. फिंगर प्रिंट तज्ज्ज्ञ सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल खोटे, महिला पोलीस अंमलदार प्रिती बगाडे आणि वैशाली पवार यांनी या ठशांचा तांत्रिक अभ्यास केला. तसेच संबंधित मृतक संजू दामोधर पालकर (रा. स्वामी विवेकानंद नगर, एन-१२, हुडको, छत्रपती संभाजीनगर) असल्याचे निष्पन्न केले. विशेष म्हणजे मृतक संजू पालकर याला २००६ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील सिडको पोलीस स्टेशनमध्ये चोरीच्या एका गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यावेळी घेतलेल्या फिंगर प्रिंटच्या रेकॉर्डची सांगड २०२४ मधील मृतदेहाच्या ठशांशी जुळल्याने या प्रकरणाचा उलगडा झाला.

या मोहिमेत पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात धाड ठाणेदार प्रताप भोस, पोलीस अंमलदार शांताराम जाधव, रविंद्र चव्हाण आणि भगवान खमाटे यांनी देखील तपासात मोलाची भूमिका बजावली.