क्राईम जगत

मलकापूरमध्ये १७ वर्षीय मुलीवर बलात्कार

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी) : मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका गावातील रहिवाशी असलेल्या व महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय मुलीचा आरोपीने विनयभंग केला. पीडिता भाव देत नसल्याचे बघून नराधमाने कमरेच्या चामडी बेल्टने तिला बेदम मारहाण केली. तसेच तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना आज ७ जानेवारीच्या पहाटे समोर आली. या घटनेमुळे मलकापूर शहर व तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वरखेड येथील रहिवाशी असलेला आरोपी करण दादाराव वानखेडे (वय १९ वर्षे) याने सुरुवातीला पीडितेचा पाठलाग सुरू केला. तिच्यासोबत जवळीक साधून तिचा विनयभंग केला. एवढ्यावरच न थांबता पीडिता भाव देत नसल्याचे बघून आरोपीने कमरेच्या बेल्टने पीडितेला बेदम मारहाण केली. तसेच तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. सोबतच पीडितेला व तिच्या कुटुंबियांना कॉल करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या घटनेनंतर पीडितेने व तिच्या कुटुंबीयांनी मोठी हिंमत करून मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले. घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिताचे कलम ७४, ७५, १३७ (२), ६४, ११५ (२), ३५१ (२)(३) सह कलम ४, ६, ८, १२ पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून वैद्यकीय अहवालात तिच्या शरीरावर दुखापतीच्या खुणा तसेच अत्याचारासंदर्भातील महत्त्वपूर्ण निरीक्षणांची नोंद आहे. गुन्ह्याचा पुढील तपास मलकापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे मलकापूर परिसरात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *