स्मार्ट बुलढाणा

एसटी महामंडळाच्या इंधन बचतीसाठी सांघिक भावणेने काम करावे: नितीन जैस्वाल

बुलडाणा,(प्रतिनिधी): इंधन बचतीसह, पर्यावरण पूरक राष्ट्रनिर्मिती करण्यासाठी सर्वोत्तम सेवा देण्यासाठी एसटी कामगारानी तत्पर राहून सांघिक भावनेतून काम करावे, असे आवाहन बुलडाणा विभागाचे यंत्र अभियंता नितीन जैस्वाल यांनी केले.

बुलडाणा आगारात आगार व्यवस्थापक अमोल गडलिंग यांनी आयोजित केलेल्या इंधन बचत मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बुलडाणा ग्रामीण ठाणेदार गजानन कांबळे, सहा.उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सतेश टूले, एसटी महामंडळाचे सहा. यंत्र अभियंता विनोद इलामे, स्थानक प्रमुख रामकृष्ण पवार, कार्यशाळा अधीक्षक तुळशीराम धारपवार, वाहतूक निरीक्षक देवयानी बारी यांची उपस्थिती होती.
एसटी कामगार वर्गाने प्रत्येक अडचणीचे निराकरण करत अमूल्य योगदान दिले असून असून एसटीचा कामगार हा सर्वाधिक नियमांचे पालन करणारा आहे, असे प्रतिपादन ठाणेदार गजानन कांबळे यांनी केले. नियमबाह्य अवैध प्रवाशी वाहतूक रोखण्यासाठी आरटीओ खाते आणि एसटी प्रशासन कटिबद्ध असून
इंधन बचतमध्ये एसटीच्या बसेस सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असल्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे निरीक्षक सतेश टूले यांनी सांगितले. प्रास्ताविक विनोद ईलामे यांनी केले. विभाग नियंत्रक शुभांगी सिरसाट यांच्या आदेशानुसार इंधन बचत मोहीम प्रत्येक आगारात राबविण्यात येत असून त्यांच्याकडून वाहतुकीच्या नियमांचे आणि इंधन बचतचे पालन करण्याविषयी प्रतिज्ञा म्हणवून घेतली जात आहे. या मोहिमेत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून कामगारांची वैद्यकिय तपासणी शिबीरे सुद्धा घेण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आगार व्यवस्थापक अमोल गडलिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तुळशीराम धारपवार, स्थानक प्रमुख रामकृष्ण पवार, देवयानी बारी, वाहतूक नियंत्रक
ठाकरे, मधुकर निकम काकडे, अरुण राठोड रांमेश्वर खरात, स्वप्नील पाटील, अरविंद लांडगे, कुऱ्हाडे, राजेश आगाशे, जनार्दन कायंदे, आर.एस. वानखेडे, बी.आर.गायकवाड, जी.एस. सरदार, अनंत थोरात, बी.इ.हराळ, श्याम कराळे, एस.पी.सोनवणे, जी.डी. चिंचोले, बी.जी.हुडेकर, सचिन खिर्डेकर, राजेंद्र पवार, अनिता राऊत, पूजा इंगळे, माधुरी मिसाळ, शीला जाधव, सुरेश वखरे, नपते, सुनील शेळके, त्र्यंबक भागवत यांनी परिश्रम घेतले. यावेळी इंधन बचतमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *