स्मार्ट बुलढाणा

देवदर्शनासाठी जाणाऱ्या मलकापूरच्या तरुणावर काळाची झडप

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी): मध्यप्रदेशातील उज्जैन येथे देवदर्शनासाठी जात असताना सणावतजवळ राधास्वामी सत्संग समोर स्विफ्ट डिझायर आणि सिलेंडर ट्रकचा आमोरासमोर अपघात झाला. या भीषण अपघातात मलकापूर येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले. आज २१ जानेवारीच्या पहाटे ३ वाजता दरम्यान ही घटना घडली.

मलकापूर येथील चार तरुण स्विफ्ट डिझायर कारने उज्जैन येथे देवदर्शनासाठी निघाले होते. मध्यप्रदेशातील सणावत परिसरात त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात वाहन चालक पवन रघुनाथ चंबारे (वय २५ वर्षे) रा. हनुमाननगर, मलकापूर याचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. तर कारमधील इतर तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. या दुर्दैवी घटनेमुळे मलकापूर शहरात शोककळा पसरली असून पवन चंबारे यांच्या मृत्यूने कुटुंबीय व मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *