स्मार्ट बुलढाणा

आरसीपीच्या वीस पोलीस अंमलदारांच्या बदली

बुलढाणा,(प्रतिनिधी): बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी आज २२ जानेवारी रोजी पोलीस दलात मोठे फेरबदल केले. “आरसीपी” पथकामध्ये कार्यरत असलेल्या २० पोलीस अंमलदारांना तातडीने कार्यमुक्त करून त्यांच्या नवीन नियुक्तीच्या ठिकाणी नेमणूक दिली.
३० ऑगस्ट २०२४ रोजीच्या कार्यालयीन आदेशानुसार आर.सी.पी. पथकातील कर्मचाऱ्यांचे विविध पोलीस स्टेशनमध्ये वाटप करण्यात आले होते. मात्र, अनेक कर्मचारी अद्यापही त्यांच्या जुन्या नियुक्तीच्या ठिकाणीच कार्यरत होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी कडक पाऊल उचलत संबंधित सर्व २० कर्मचाऱ्यांना आज २२ जानेवारी रोजीच कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत.
यामध्ये अमोल राजू जाधव, सागर आनंदा गवळी, शाहेद शब्बीर शेख, राजेश रवींद्र नागरे, जय सुनील जाधव, सत्यवान शामराव साळवे आणि शिवानंद पांडुरंग मुंडे यांना खामगाव शहर, शेख समीर शेख अमीर आणि किशोर सांडू बिबे यांना मलकापूर शहर, कुणाल रवींद्र कायस्थ, सचिन साहेबराव चव्हाण, मनोहर उत्तम दामधर आणि रुपेश अशोक दहिभाते यांना जळगाव जामोद, गणेश नामदेव तायडे यांना शेगाव शहर, तसलीम चांद खान, संदिप महादु मोधे आणि पवन अर्जुन बाबर यांना नांदुरा, सचिन रमेश घुगे आणि समाधान लक्ष्मण लाड यांना शिवाजीनगर (खामगाव) तर दुर्गेश संजय गावडे यांना सोनाळा येथे नेमणूक देण्यात आली.
नमूद कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करून तसा अनुपालन अहवाल तातडीने जिल्हा कार्यालयाकडे सादर करावा, असे निर्देश देखील जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि संबंधित ठाणेदारांना दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *