स्मार्ट बुलढाणा

बुलडाणा: चिंचपूर येथील व्यक्तीचा मृत्यू

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या मेहेकर तालुक्यातील मूळ रहिवासी असलेल्या एका ५७ वर्षीय व्यक्तीला उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूचे कारण मात्र समजू शकले नाही. या प्रकरणी बुलढाणा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चिंचपूर (ता.मेहकर) हल्ली मुक्काम बुलडाणा येथील रहिवासी असलेले दिलीप राठोड यांची २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.४० वाजता दरम्यान अचानक प्रकृती बिघडली. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना तातडीने बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपघात विभागात उपचारासाठी भरती केले होते. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता, त्यांना ब्रॉट डेड घोषित केले.
या प्रकरणी डॉ.रेश्मा पटेल यांच्या वतीने कक्ष सेवक अतुल पवार यांनी पोलीस चौकीला दिलेल्या मेमोवरून बुलढाणा पोलिसात मर्ग दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार बळीराम खंडागळे हे करीत आहेत. दिलीप राठोड यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे समजू शकले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *