मलकापूर: वाघुळजवळील भीषण अपघात एक ठार
अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वाघुळ फाट्याजवळ झालेल्या भीषण रस्ता अपघातात धानोरा (ता.नांदुरा) येथील किशोर दिवारु मोरदेवे (वय ४८ वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज २७ जानेवारी २०२६ रोजी घडली.
धानोरा (ता.नांदुरा) येथील रहिवासी असेल किशोर मोरदेवे हे कामानिमित्त जात असताना वाघुळजवळ त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, मोरदेवे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांचे नातेवाईक ज्ञानराव बावणे आणि सनद काला यांनी त्यांना तातडीने मलकापूर उपजिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले. मात्र, उपस्थित डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. डॉ. शुभांगी फोंगळे आणि कक्ष सेविका पोलाखरे यांनी मलकापूर ग्रामीण पोलिसांना दिलेल्या वैद्यकीय मेमोच्या आधारे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार उल्हास मुके हे करीत आहेत. या अपघातामुळे धानोरा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

