दुधलगावातून २३ वर्षीय विवाहिता बेपत्ता
अजय टप
मलकापूर (प्रतिनिधी): तालुक्यातील दुधलगाव खुर्द नवे येथून एक २३ वर्षीय विवाहित महिला घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्याची घटना २८ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी दसरखेड एमआयडीसी पोलिसांत मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.
दुधलगाव खुर्द नवे येथील रहिवासी असलेले रविंद्र दुधाराम मिश्रा (वय ५० वर्षे) यांची मुलगी ज्योती संतोष भोई (वय २३ वर्षे) मूळ रा. पिंप्री नांदूर (ता. मुक्ताईनगर) ही सध्या आपल्या वडिलांकडे दुधलगाव खुर्द येथे राहत होती. २८ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास ती घरातील कोणालाही काहीही न सांगता निघून गेली. कुटुंबीयांनी नातेवाईक आणि परिसरात तिचा शोध घेऊनही ती मिळून आली नाही. बेपत्ता ज्योती संतोष भोई हिची उंची ५ फूट, रंग सावळा, बांधा मध्यम, केस काळे आणि लांब, तसेच तिच्या उजव्या डोळ्याच्या बाजूला काळा चट्टा असून तिने अंगात हिरव्या रंगाची साडी व ब्लाउज आणि पायात काळ्या रंगाची प्लास्टिकची चप्पल घातलेली आहे.
याप्रकरणी रविंद्र मिश्रा यांच्या तक्रारीवरून दसरखेड एमआयडीसी पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय टेकाडे, पोलीस अंमलदार संदीप रमेश पवार हे करीत आहेत. वरील वर्णनाची महिला कोणास आढळून आल्यास तात्काळ एमआयडीसी पोलीस स्टेशन दसरखेड यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

