महाराष्ट्र माझा

फेक फॉलोअर्सच्या बाजारात ‘हिंदवार्ता’चा अस्सल डंका!

बुलढाणा: आजच्या डिजिटल युगात जिथे ‘लाईक्स’ आणि ‘फॉलोअर्स’ विकत घेण्याचा बाजार भरलेला असतो, तिथे ‘हिंदवार्ता’ या न्यूज पोर्टलने आपल्या विश्वासार्हतेच्या जोरावर एक नवा इतिहास रचला आहे. कोणत्याही कृत्रिम क्लृप्त्या न वापरता, केवळ सत्य आणि सडेतोड पत्रकारितेच्या जोरावर वाचकांचा विश्वास संपादन करत ‘हिंदवार्ता’ने अवघ्या ३० दिवसांत १ लाख ७६ हजार ९१६ पेक्षा जास्त पेजव्ह्यूजचा टप्पा ओलांडला आहे.
आजकाल सोशल मीडियावरील आकडे फुगवून दाखवण्यासाठी ‘बॉट’ किंवा ‘फेक फॉलोअर्स’चा आधार घेतला जातो. पैशांच्या जोरावर कृत्रिम ट्रॅफिक निर्माण करून यशाचा आभास निर्माण केला जातो. मात्र, ‘हिंदवार्ता’चे यश हे ‘सेंद्रिय’ (Organic) आहे. हे यश कोणत्याही त्रयस्थ संस्थेचे नसून थेट Google Analytics (MonsterInsights) कडून प्रमाणित झालेली अधिकृत आकडेवारी आहे. यामध्ये नोंदवलेले १ लाख ११ हजार ६६३ सेशन्स हे केवळ आकडे नसून, ‘हिंदवार्ता’वर प्रेम करणाऱ्या जिवंत वाचकांनी दिलेली पावती आहे. आमचे फॉलोअर्स ‘फेक’ नाहीत, तर ते दररोज समाजातील घडामोडींवर नजर ठेवणारे सुजाण नागरिक आहेत, हे यातून सिद्ध झाले आहे.
सडेतोड लेखणी आणि आक्रमक भूमिका
‘हिंदवार्ता’ इतक्या कमी वेळात लोकांच्या गळ्यातील ताईत का बनले? याचे उत्तर पोर्टलच्या आक्रमक भूमिकेत दडलेले आहे. मुजोर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर ‘हिंदवार्ता’ सदैव शब्दांचे प्रहार करत आहे. जिथे इतर माध्यमे सोयीची भूमिका घेतात, तिथे आम्ही सामान्यांची बाजू रोखठोकपणे मांडली असून वाचकांशी प्रतारणा न करता बातमीमागील सत्य शोधून ते लोकांसमोर मांडल्याने जनतेने ‘हिंदवार्ता’ला “आमचा आवाज” म्हणून स्वीकारले आहे.
काय सांगते आकडेवारी?
पोर्टलच्या प्रगतीचा आलेख केवळ वाढता नाही, तर तो थक्क करणारा आहे. गेल्या ३० दिवसांत तब्बल १ लाख ७६ हजार ९१६ लोकांनी पेजव्ह्यूज (४००२ टक्के) केले असून  युजर्स संख्या ४३ हजार ९७ म्हणजेच | १४५१ टक्क्यांवर, तर नवीन युजर्स संख्या ४१ हजार ३३६ म्हणजे १३९० टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे.
या आकडेवारीतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ‘सरासरी वेळ’ असून वाचक केवळ पोर्टलवर येत नाहीत, तर ते थांबून बातम्यांचे सविस्तर वाचन करत असल्याने ‘हिंदवार्ता’चा मजकूर वाचकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरत आहे.
आम्ही सदैव आपले कृतज्ञ!
हे यश म्हणजे केवळ आकडेवारीचा खेळ नसून आमच्या खांद्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव आहे. ‘हिंदवार्ता’ची लेखणी कधीही झुकणार नाही आणि कधीही विकली जाणार नाही, हा आमचा शब्द आहे. केवळ आकड्यांची शर्यत जिंकण्यासाठी नव्हे, तर लोकहितासाठी आमची ही धडाकेबाज वाटचाल अविरतपणे अशीच सुरू राहील. बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील वाचकांनी दिलेल्या या उदंड प्रतिसादाबद्दल ‘हिंदवार्ता’ टीम सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार मानत आहे. हे यश आमचे नसून तुमचं आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *