क्राईम जगत

थरकाप: पाच वर्षांच्या चिमुरडीवर नराधमाचा अत्याचार

बुलढाणा,दि. १ (प्रतिनिधी): एका २५ वर्षीय परप्रांतीय मजुराने ५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा तालुक्यातील हतेडी शिवारातील शासकीय वैद्यकीय महावद्यिालयाच्या बांधकामाच्या ठिकाणी समोर आली. बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी यातील आरोपीला मलकापूर रेल्वे स्टेशनवरून बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे पोटी लेकी आणि पाठी बहीणी असलेल्या प्रत्येकाच्या अंगाचा थरकाप उडाला आहे.
हतेडी शिवारात शासकीय वैद्यकीय महावद्यिालयाचे बांधकाम सुरु आहे. सदर काम ‘सॅम इंडिया’ या कंपनीमार्फत करण्यात येत आहे. या ठिकाणी झारखंडमधील संतोष ब्रिजपाल भोईया (वय २५ वर्षे) हा मजूर कामाला होता. २८ जानेवारी रोजी दुपारी चिमुरडी एकटी असल्याचे पाहून नराधम संतोषने तिला झोपडीत नेऊन तच्यिावर अत्याचार केला. त्याच्या या कृत्यामुळे मुलीला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. त्यामुळे घाबरलेल्या आरोपीने पकडले जाण्याच्या भीतीने पीडित मुलीला उपचारासाठी नेण्याऐवजी तिचे अपहरण केले आणि तिला घेऊन थेट मलकापूर रेल्वे स्टेशन गाठले. तिथून पसार होण्याच्या तयारीत असतानाच बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या. धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपीकडे साधे आधार कार्ड देखील नाही. नियमानुसार मजुरांची नोंदणी आणि पडताळणी करणे आवश्यक असताना, कोणत्याही कागदपत्रांशिवाय परप्रांतीय मजूर कामावर ठेवल्याने सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलिसांत आरोपी संतोष भोईया विरुद्ध पोक्सो आणि अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपीची पोलीस कोठडी संपल्यानंतर आता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.चिमुकलीची प्रकृती चिंताजनक
नराधमाने पीडितेवर केलेल्या या पाशवी अत्याचारामुळे पीडितेला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत आहे. रक्तस्त्राव थांबत नसल्याने तिला तातडीने अकोला येथील शासकीय वैद्यकीय महावद्यिालयात हलवण्यात आले आहे. तिथे तच्यिावर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *