क्राईम जगत

पुन्हा दोन महिलांसह तीन चिमुरडे बेपत्ता!

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): चिखली आणि देऊळगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीतून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिला आणि दोन चिमुकल्या मुलांसह एकूण ५ जण बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीतून मुली आणि महिला बेपत्ता होण्याचे सत्र अविरत सुरू असून मागील पाच दिवसांत जिल्ह्यातून ९ मुली आणि १ महिला बेपत्ता झालेल्या आहेत. बेपत्ता होण्याच्या या वाढत्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
चिखली: चिखली पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या खंडाळा मकरध्वज येथील दिपाली गोपाल जगधने (वय २४ वर्षे) ही महिला तिच्या निखिल ( वय ७ वर्षे) आणि अंश (वय ५ वर्षे) या दोन मुलांसह १ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास दिपाली आपल्या मुलांसह गावातील एका ओळखीच्या व्यक्तीच्या एमएच-०३-एक्सभी-१६६२ क्रमांकाच्या स्वीफ्ट डिझायर गाडीने मेहकर येथील आत्याकडे घरगुती सामान आणण्यासाठी गेली होती. मात्र, ती अद्याप घरी परतली नाही. विशेष म्हणजे ज्या गाडीतून ती गेली होती, त्या गाडीचा चालक विजय मलवार हादेखील बेपत्ता आहे. दिपालीने हिरव्या रंगाची साडी नेसली असून तिच्या उजव्या हातावर गोपाल, असे नाव गोंदलेले आहे.
देऊळगाव राजा: देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळगाव चिलमखॉ येथून अनिता विनोद पिंपळे (वय २७ वर्षे) ही विवाहिता २ फेब्रुवारीच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास घरातून कोणालाही न सांगता निघून गेली. नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती मिळून आली नाही. तिच्याकडे रेडमी कंपनीचा मोबाइल आणि काही रोख रक्कम असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास देऊळगाव राजा पोलीस आहेत.
चिखली: दुसरी घटना चिखली येथील बस स्थानकावर ३ फेब्रुवारी रोजी घडली. माळेगाव येथील रहिवासी मनीषा परमेश्वर चोडकर ( वय १८ वर्षे ४ महिने) ही मुलगी तिच्या आईसोबत घरी जाण्यासाठी निघाली होती. मनीषाची तब्येत बिघडल्याने तिची आई तिला हॉस्टेलवरून घरी घेऊन जात होती. दोन्ही मायलेकी चिखली बस स्थानकावर आल्यानंतर मुलीला अचानक उलटी झाली. त्यामुळे आई पाणी आणण्यासाठी गेली असता, मुलगी मनीषा तिथून गायब दिसली. तिचा शोध घेतला असता, ती कुठेच मिळून आली नाही. मनीषाने चॉकलेटी रंगाचे टॉप आणि काळी पॅन्ट घातली असून तिचा रंग सावळा आहे. बेपत्ता मुली आणि महिलांबाबत काही माहिती मिळाल्यास संबंधित पोलीस स्टेशनसोबत संपर्क साधावा,असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *