मेहकर हादरले: २२ वर्षीय तरुणीची आत्महत्या
अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी) : मेहकर शहरातील रोहीदास नगर परिसरात राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीने स्वतःच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना ५ फेब्रुवारीच्या सायंकाळी घडली.एका तरुणीने उचललेल्या या पावलामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मेहकर शहरातील वार्ड नंबर १६, रोहीदास नगर येथे आपल्या कुटुंबासोबत राहणारी यशश्री मनोज शिरे (वय २२ वर्षे) हिने ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास घरी कोणी नसताना स्वयंपाकघरातील छताच्या पंख्याला पांढऱ्या रंगाच्या सुती दोरीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी प्रविण डिगांबर शिरे (वय ४६ वर्षे) यांनी मेहकर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कलम १९४ अन्वये मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार सदानंद चाफले हे करीत आहेत. यशश्रीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

