स्मार्ट बुलढाणा

सरकारी कर्मचाऱ्यांचे बुलढाण्यात रणशिंग!

बुलढाणा,(प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचारी संघटनेने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. लघु पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांनी १६ फेब्रुवारी २०२६ पासून बेमुदत ‘काम बंद’ आंदोलनास प्रारंभ केला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या हक्काच्या मागण्या प्रलंबित आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही निर्णय होत नसल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी असहकार आणि काम बंद आंदोलन सुरू केले आहे. लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना सादर केलेल्या पत्रातून १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘जशी आहे तशी’ जुनी पेन्शन योजना लागू करावी. चतुर्थ वेतन आयोगापासून लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात असलेल्या त्रुटी बक्षी समितीच्या अहवालानुसार त्वरित दूर कराव्यात. अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांवरील निर्बंध हटवून, प्रतीक्षा सूचीवरील उमेदवारांना विनाविलंब नियुक्ती द्यावी. महामंडळांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन थेट शासनाच्या कोषागारातून करण्यात यावे, अशा मागण्या केल्या असून आंदोलनात डी.टी.शेगोकार, सावळे, जयंत शेलेकर, के.डी.जवादे, एम.डी.सुसर, गोपाल कुळसुंदर, अमोल नारखेडे, अमोल मोरे, एम.डी.सुसर, सावळे मॅड संजीवनी पायघन, इंगळे मॅडम, सीमा चोपडे, प्रज्ञा जुंबड, एस.व्ही.गुरव, एस. एन.जेऊघाले, एस.पी.पाटील, गजानन भुसारी यांच्यासह अनेक कर्मचारी सहभागी झाले आहेत. महत्त्वाचे कर्मचारी या संपात उतरल्याने पाटबंधारे विभागाच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.आता शासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *