क्राईम जगत

मलकापूर: जिया कंपनीच्या टॉवरची फायबर केबल कापली

अजय टप

मलकापूर, (प्रतिनिधी) : मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन महावितरण कंपनीच्या डीपीसी तार चोरी गेल्याची घटना ताजी असतानाच, आता शहरालगत असलेल्या बेलाड शिवारातील जिया कंपनीच्या मोबाइल टॉवरची अज्ञात इसमांनी तोडफोड केली. नव्हे तर सुमारे दीड ते दोन लाख रुपयांची फायबर ऑप्टिक केबल चोरून नेली. ही खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रताप टेक्नोक्रॅट्स प्रायव्हेट लिमिटेड नामक कंपनीकडे जिया कंपनीच्या मोबाइल टॉवर्सच्या देखरेखीची जबाबदारी आहे. मलकापूर शहरा लगत असलेल्या बेलाड शिवारात या कंपनीचा टॉवर आहे. १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास आणि ११ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे २ वाजेच्या दरम्यान अज्ञात आरोपींनी या टॉवरची महागडी फायबर ऑप्टिक केबल कटरने कापून तिचे नुकसान केले आणि ती लंपास केली. यामुळे कंपनीचे अंदाजे १.५० ते २ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. सोबतच परिसरातील दूरसंचार सेवाही विस्कळीत झाली.

याप्रकरणी कंपनीचे प्रतिनिधी कमलेश रामाजी डांगे (वय ४६ वर्षे) रा. आय.टी. पार्क, परसोडी, नागपूर) यांनी मलकापूर शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी १६ फेब्रुवारी रोजी भारतीय न्याय संहिताचे कलम ३२४ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम बरदाडे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *