स्मार्ट बुलढाणा

धाड: अंध-दिव्यांग विद्यार्थ्यांना फळवाटप करून राष्ट्रसंत गाडगे महाराजांना अभिवादन

अभिनय बोर्डे
धाड, (प्रतिनिधी): वैराग्यमूर्ती ग्रामस्वच्छतेचे जनक आणि थोर समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती आज २३ फेब्रुवारी रोजी धाड परिसरातील मसला बुद्रुक येथील बहुउद्देशीय संस्थेत मोठ्या उत्साहात पार पडली. या निमित्ताने सामाजिक उपक्रम राबवून तसेच अंध व दिव्यांग विद्यार्थ्यांना फळवाटप करून महाराजांना अभिवादन करण्यात आले.
राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर अंध-दिव्यांग विद्यार्थ्यांना फळवाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. उपस्थित मान्यवरांनी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. सामाजिक कार्यकर्ते सुनील वाघ व प्रविण बोर्डे यांनी गाडगे महाराजांच्या जीवन चरित्रावर मनोगत व्यक्त केले. महाराजांचे कीर्तन आणि समाजप्रबोधन आजही समाजाला दिशा देणारे असल्याचे त्यांनी बोलताना नमूद केले. मूकबधिर संस्थेचे अध्यक्ष शिवनारायण पोफळकर यांनी मी गाडगे महाराजांचा वारसा आणि वसा समोर घेऊन जात आहे. महाराजांच्या कार्यामुळेच मला प्रेरणा मिळाली असून मी या मूकबधिर, अपंग व निराधार मुलांचा सांभाळ स्वतःच्या खर्चातून करत असल्याचे सांगितले. हे सांगत असताना त्यांना आपले अश्रू अनावर झाले. त्यामुळे सर्वजण भावूक झाले होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रवींद्र पालकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सतीश शिरसाट, मयूर वाघ, शरद फौलाने, विलास खिरडकर, प्रसाद वाघ, राहुल हिवाळे, सुनील काकडे, किशोर शिरसाट, राहुल क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *