क्राईम जगत

“लुडो”च्या वादातून दाताळ्यात दोन गटात हाणामारी

अजय टप

मलकापूर (प्रतिनिधी): मोबाइल फोनवर लुडो नावाचा खेळ खेळताना मधे बोलल्याच्या शुल्लक कारणावरून दोन गटात शाब्दिक चकमक झाली. नव्हेतर तर या चकमकीचे रूपांतर हाणामारीत झाले. ही घटना मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या दाताळा येथील इंदिरानगर परिसरात घडली. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी परस्पर तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

दाताळा येथील इंदिरानगर परिसरात राहणारे गजानन लक्ष्मण सावळे (वय ४२ वर्षे) हे २३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास आपल्या मित्रांसह मोबाइलवर लुडो खेळत होते. यावेळी तिथे आलेल्या समीर शहा जाबीर शहा याने खेळाच्या दरम्यान मध्ये हस्तक्षेप केला. गजानन सावळे यांनी “तू मध्ये का बोलतोस?” असे विचारले असता, समीर शहा याने त्यांना छातीवर, तोंडावर आणि कपाळावर चापटी-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवाने मारण्याची धमकी दिली. तसेच आसीफ शहा मंसुर शहा यानेही त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी गजानन सावळे यांच्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी समीर शहा व आसीफ शहा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ११५ (२), ३५१ (२)(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर याच प्रकरणात समीर शहा जाबीर शहा (वय २२ वर्षे) यांनी दिलेल्या प्रति-तक्रारीनुसार गजानन सावळे आणि त्यांचे मित्र लुडो खेळत होते. तर समीर त्यांचा खेळ पाहत उभा होता. यावेळी समीर काहीतरी बोलले असता, गजानन लक्ष्मण सावळे यांनी “तू मध्ये का बोलला?” असे म्हणून त्यांच्या डाव्या गालावर चापट मारली आणि त्याची गचांडी धरून शिवीगाळ केली. तसेच ईश्वर मुरलीधर सुरळकर आणि निखिल अंबादास खराटे यांनी देखील अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. या प्रकरणी पोलिसांनी गजानन सावळे, ईश्वर सुरळकर आणि निखिल खराटे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५ (२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार बाळू टाकरखेडे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *