क्राईम जगत

धक्कादायक: चांडोळ येथे ५० वर्षीय व्यक्तीची गळफास लावून आत्महत्या

नदीम शेख

चांडोळ,(प्रतिनिधी): येथील चांडोळ येथील एका ५० वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरी पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास लावून जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना आज गुरुवार दिनांक १२ मार्च रोजी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.

चांडोळ (ता.बुलढाणा) येथील रहिवासी असलेले देविदास दशरथ शेळके (वय ५० वर्षे) यांनी आज गुरुवार, दि. १२ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास एकटे होते. त्यांनी घरातील बैठक खोलीतील छताच्या पंख्याला नायलॉन दोरीने गळफास घेतला. ही बाब मृतकाचा मुलगा अनिकेत शेळके याच्या निदर्शनास येताच त्याने तातडीने त्याचे काका रामदास शेळके यांना फोनवरून “बाबांनी हॉलमध्ये पंख्याच्या रॉडला दोरीने फाशी घेतली आहे, तुम्ही लवकर घरी या.”, अशी माहिती दिली. रामदास शेळके यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, देविदास शेळके हे गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच धाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळ पंचनामा केला. मृतदेह खाली घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय रवाना करण्यात आला.

याप्रकरणी रामदास दशरथ शेळके (वय ५२ वर्षे) यांनी धाड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १९४ अन्वये मर्ग दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार शांताराम जाधव हे करीत आहेत. देविदास शेळके यांनी आत्महत्या का केली,याचे कारण समजू शकले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *