स्मार्ट बुलढाणा

धाड येथे शुक्रवारी ‘विशाल हिंदू संमेलन’

धाड,( प्रतिनिधी): राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त धाड तालुक्याच्या वतीने शुक्रवार १३ मार्च रोजी ‘विशाल हिंदू संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. ‘हिंदुत्वाचा जागर आणि राष्ट्रभक्तीचा हुंकार’ देण्याच्या उद्देशाने आयोजित हे संमेलन धाड ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील दिलीप शिंदे यांच्या शेतात सायंकाळी ७ वाजता पार पडणार आहे.
विविध संप्रदाय, पंथ आणि जातीभेदाचे समूळ उच्चाटन करून हिंदू समाजात एकात्मता निर्माण व्हावी, हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सकल हिंदू समाजाला एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या विशाल संमेलनासाठी प्रमुख वक्ते म्हणून ह.भ.प. सोपान महाराज कनेरकर (अकोला) मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्यासोबतच आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे, याकडे प्रामुख्याने हभप स्वामी देवेंद्रचैतन्यजी महाराज (पाताळेश्वर महादेव संस्थान, अवघडराव सावंगी), साध्वी त्रिवेणीजी देशमुख (छत्रपती संभाजीनगर), हभप सतीश महाराज डोईफोडे (जागदरी), प.पू. गजानन गिरी महाराज (राज गणेश संस्थान, चांडोळ), प.पू. सदाशिव महाराज (मासरुळ), अंबादासजी साठे (उदयनगर, बुलढाणा) यांची उपस्थिती राहणार आहे.
सकल हिंदू समाज, धाड यांच्या वतीने आयोजित या भव्य सोहळ्याला धाड परिसरातील सर्व हिंदू बांधवांनी, माता-भगिनींनी आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *