क्राईम जगत

धक्कादायक! पोटच्या मुलासोबत अश्लील चाळे आणि पत्नीवर अत्याचार

अजय टप/आनंद इंगळे

देऊळगाव राजा, (प्रतिनिधी): माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना देऊळगाव राजा शहरात उघडकीस आली आहे. एका होमगार्ड असलेल्या नराधम पतीने आपल्याच अल्पवयीन मुलासोबत अश्लील लैंगिक चाळे केल्याचा आणि पत्नीच्या इच्छेविरुद्ध वारंवार अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलिसांनी पतीसह एकूण १३ जणांविरुद्ध पोक्सो आणि बीएनएस अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

देऊळगाव राजा शहरातील सिव्हिल कॉलनी परिसरात राहणाऱ्या सिमा दीपक म्हस्के (वय ३० वर्षे) यांचे पती आरोपी दीपक भास्कर म्हस्के (वय ३८ वर्षे) याने २३ नोव्हेंबर २०२५ ते १४ मार्च २०२६ या दरम्यान सीमाच्या अल्पवयीन मुलासोबत अश्लील लैंगिक चाळे केले. एवढेच नव्हे तर, त्याने सीमाचा इच्छेविरुद्ध वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिचा छळ केला. हा प्रकार जेव्हा पीडित महिलेने आपल्या सासरच्या इतर मंडळींना सांगितला, तेव्हा तिला न्याय मिळण्याऐवजी उलट धमकावण्यात आले. “आमच्या घराची बदनामी करू नको, जर कोणाला हे सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी आरोपी भास्कर गोपाळा म्हस्के, पंचफुला भास्कर म्हस्के, शशिकला रवींद्र गवई, रवींद्र गवई, भारती जितेंद्र तायडे, जितेंद्र तायडे, आरती शिवाजी लांडगे, शिवाजी लांडगे, कीर्ती तुकाराम घोरपडे, तुकाराम घोरपडे, प्रतिभा अरुण वानखेडे आणि अरुण वानखेडे यांनी दिली. तसेच, माहेरून पैसे आणण्याच्या कारणावरून पीडितेचा शारीरिक छळ करून तिला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या.

या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी दीपक भास्कर म्हस्के (पती), भास्कर गोपाळा म्हस्के, पंचफुला भास्कर म्हस्के, शशिकला रवींद्र गवई, रवींद्र गवई, भारती जितेंद्र तायडे, जितेंद्र तायडे, आरती शिवाजी लांडगे, शिवाजी लांडगे, कीर्ती तुकाराम घोरपडे, तुकाराम घोरपडे, प्रतिभा अरुण वानखेडे, अरुण वानखेडे यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ८५, ११५(२), ३५१(२), ३५१(३) सह कलम ८, १७ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळाला भेट दिली. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक क्रांती ढाकणे या करत आहेत. या घटनेमुळे देऊळगाव राजा परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अशा विकृत मानसिकतेच्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *