एक्का बादशाहा जुगारावर पोलिसांची धाड
नांदुरा,(प्रतिनिधी): नांदुरा येथील वार्ड क्रमांक एक मधील गजानन महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी पैशाच्या हारजीतवर एक्का बादशाहाचा नावाचा जुगार खेळणाऱ्यांना पोलिसांनी रंगेहात पकडल्याची घटना २० मार्चच्या दुपारी १.३० वाजता घडली. या प्रकरणी नांदुरा पोलिसांत महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदुरा येथील वार्ड क्रमांक एक मधील गजानन महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी पैशाच्या हारजीतवर एक्का बादशाहाचा नावाचा जुगार खेळल्या व खेळविल्या जात असल्याची गुप्त माहिती नांदुरा पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचा समक्ष उपरोक्त ठिकाणी धाड टाकली. त्यावेळी आरोपी रवि राजेश काळे (वय २९ वर्षे) रा. वार्ड क्रमांक एक (नांदुरा), गौतम श्रीराम वाकोडे (वय ३२ वर्षे) रा.वार्ड क्रमांक एक (नांदुरा), शेख अकील शेख मकसूद (वय ३४ वर्षे) रा. सिध्दीकीया नगर (नांदुरा), अजय राजु ओवाळकर (वय २३ वर्षे) रा. तथागत नगर वार्ड क्रमाक एक (नांदुरा) हा पैशाच्या हारजीतवर एक्का बादशाह नावाचा जुगार खेळताना व खेठळवितांना मिळून आला. यावेळी उपरोक्त आरोपींच्या ताब्यातून रोख १ हजार ८५० रूपये, ५२ ताशपत्ता (किंमत ५० रुपये), असा एकूण १ हजार ९०० रूपयांचा जुगार माल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नांदुरा पोलिसांत उपरोक्त आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यो कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार जवंजाळ हे करीत आहेत.

