Home Uncategorized मलकापुरात बिबट्याची चाहूल; शेतकऱ्यांमध्ये भीती
Uncategorized

मलकापुरात बिबट्याची चाहूल; शेतकऱ्यांमध्ये भीती

मलकापूर,(प्रतिनिधी): तालुक्यातील दुधलगाव, वाघोळा चिंचोल व म्हैसवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. वनविभाग व पोलिसांनी तत्काळ पाहणी करून शेतकऱ्यांना सावध राहण्याचे व संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्तसंचार असल्याचे शेतकऱ्यांनी पाहिले आहे. सध्या रब्बी हंगामासाठी गहू, मका, ज्वारी आदी पिकांची पेरणी सुरू असून, पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागत आहे. मात्र बिबट्याच्या भीतीमुळे अनेक शेतकरी रात्री तर सोडाच, दिवसाही शेतात जाण्यास घाबरत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे आतापर्यंत या बिबट्याने कोणावरही हल्ला केलेला नाही किंवा शेतीचे कोणतेही नुकसान केलेले नाही. तरी देखील अचानक दिसणाऱ्या वन्यप्राण्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात अनामिक भीती निर्माण झाली आहे. ही बाब परिसरातील शेतकऱ्यांनी शिवसेना तालुकाप्रमुख विजय साठे यांच्या निदर्शनास आणून दिली.

विजय साठे यांनी पुढाकार घेत वन विभाग व पोलस प्रशासनाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी शिरसाठ, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पेंदोर यांच्यासह पथकाने परिसरात पाहणी व शोधमोहीम राबवली. मात्र बिबट्या प्रत्यक्ष आढळून आला नाही. वनविभागाच्या वतीने योग्य ती उपाययोजना करण्यात येईल, असा दिलासाही देण्यात आला.

वनविभागाचे अधिकारी शिरसाठ यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत बिबट्याच्या वर्तनाबाबत मार्गदर्शन केले व त्यांच्या मनातील भीती कमी करण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलीस निरीक्षक राजेंद्र पेंदोर यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले असून प्रशासन पूर्णत: सतर्क असल्याचे स्पष्ट केले.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

अंढेरा परिसरात ४४ लाखांचा अफू जप्त; शेतात कांदा बियाण्यांच्या आड सुरू होती लागवड

बुलढाणा,(प्रतिनिधी): जिल्ह्यात अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी...

धाड:भगव्या वादळाने मोडले गर्दीचे सर्व रेकॉर्ड; अंगावर शहारे आणणारी ऐतिहासिक शोभायात्रा

अभिनय बोर्डे धाड,(प्रतिनिधी): “जय श्रीराम…” च्या गगनभेदी गर्दीत, बेंजोचा दणदणाट, हातात फडकणारे...

धाड: गुम्मी ग्रामपंचायतीचा कारभार आधांतरी

अभिनय बोर्डे बुलढाणा,(प्रतिनिधी): तालुक्यातील गुम्मी ग्रामपंचायत प्रशासनाकडून सध्या “अंधेरी नगरी” राज सुरू...

आता…अब तक छप्पन नहीं, सिर्फ पचपण!

शेगाव,(प्रतिनिधी): राज्य परिवहन महामंडळाची बस म्हणजे ग्रामीण नागरिकांसाठी वरदानच आहे. ५५ प्रवाशांची...