क्राईम जगत

सैलानीत बलात्कार!: २५ वर्षीय महिला ठरली शिकार

सैलानी,(प्रतिनिधी): सैलानी (ता. बुलढाणा) येथे दर्शनासाठी आलेल्या एका २५ वर्षीय महिलेवर ओलांड्यावर आंघोळीला नेतो, असे सांगून नराधमाने लैंगिक अत्याचार केला. ही धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली असून या प्रकरणी रायपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या तासाभरात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
आंध्र प्रदेश येथील असलेली एक २५ वर्षीय पीडित महिला गेल्या काही दिवसांपासून सैलानी येथे वास्तव्यास आहे. सैलानी येथील रहिवासी असलेला आरोपी रामदास गंगाराम शिंदे (वय ३८ वर्षे) याने पीडित महिलेला “ओलांड्यावर आंघोळीला नेतो” असे सांगून तिला विश्वासात घेतले. आणि पीडितेला आंघोळीला न नेतात लगतच असलेल्या तुरीच्या शेतात घेऊन जात तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. पीडितने आरडाओरड केल्याने तिचा आवाज ऐकून परिसरातील दोन युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीच्या ताब्यातून पीडितेची सुटका केली. दरम्यान, घटनास्थळाकडे लोकांचा जमाव येत असल्याचे बघून आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी पीडितने रायपूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ६४ (१) अन्वये गुन्हा दाखल केला. तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार निलेश सोळंके यांनी तत्काळ तपासचक्रे फिरवत आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने एका तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *