क्राईम जगत

धाड पोलिस स्टेशनची विशेष मोहीम!

धाड (प्रतिनिधी) :- धाड पोलिसांच्या वतीने धाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष दंडात्मक मोहीम राबवण्यात आली. अचानक राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे वाहनधारकांमध्ये चांगली खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रताप बोस, पोलीस अंमलदार रविंद्र बऱ्हाटे, श्रीकृष्ण चव्हाण, युवराज मुळे, देवेंद्र मुळे, कुमोद जाधव, सतीश जाधव, भास्कर जाधव, अनील ताम्हणे, राजु माळी, महीला पोलीस अंमलदार वैशाली कोरडे यांनी या मोहिमेत ट्रिपल सीट आणि विना ड्रायव्हिंग लायसन्स दुचाकी चालवणाऱ्यांवर मुख्य लक्ष केंद्रित केले. सुमारे दीड तासाच्या या धडक कारवाईत पोलिसांनी एकूण ३४ वाहनांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करत २७ हजार रुपयांचा दंड वसूल केला. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरुद्ध पोलिस स्टेशन धाडने उचललेले हे पाऊल अत्यंत प्रशंसनीय असून सदर मोहीम अविरत सुरू ठेवण्याची गरज आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *