Home क्राईम जगत एक कोटीसाठी रक्ताळला चाळीसगाव घाट!
क्राईम जगत

एक कोटीसाठी रक्ताळला चाळीसगाव घाट!

सिल्लोड,(प्रतिनिधी) : सिल्लोड (जि.छत्रपती संभाजीनगर) च्या अडत व्यापारी वर्तुळात तुकाराम गव्हाणे हे एक प्रतिष्ठित नाव. ९० एकर शेतीचे मालक, स्वतःचे कृषी केंद्र आणि  भूसार मालाचा भला मोठा व्यापार. २७ डिसेंबरची ती संध्याकाळ तुकाराम गव्हानेंसाठी आयुष्यातील काळरात्र ठरली.

       व्यापारी गव्हाणे २७ डिसेंबर रोजी उंडणगाव येथून एक लाख रुपये घेऊन मोटारसायकलने बोदवडकडे जाण्यास निघाले. रात्रीचे ८ वाजले होते. थंडीचे दिवस असल्याने रस्ता सामसूम होता. सगळीकडे काळाकुट्ट अंधार पसरलेला होता. रस्त्यात दबा धरून बसलेल्या आरोपी सचिन बनकर आणि त्याच्या चारही साथीदारांना तुकाराम गव्हाणे यांच्याकडे मोठी रक्कम असल्याची पक्की खात्री होती. गव्हाणे यांची मोटारसायकल समोर येताच उपरोक्त आरोपींनी दुचाकी अडवून त्यांचे अपहरण केले.
        इकडे, रात्रीचे १२ वाजले तरी गव्हाणे घरी परतले नव्हते. त्यामुळे त्यांच्या घरात चिंतेचे वातावरण होते. आपले वडील घरी येण्याची प्रतीक्षा लागून असलेल्या त्यांच्या मुलाच्या मोबाइलवर गव्हाणे यांच्या मोबाइलवरून फोन आला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने “तुझ्या वडिलांना जिवंत पाहायचं असेल, तर एक कोटी रुपये घेऊन ये!”, अशी धमकी दिली. धमकीचे शब्द कानावर पडताच संपूर्ण कुटुंब हादरले. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना काय करावे आणि काय नाही, काहीच सुचेनासे झाले होते. थोड्या वेळानंतर काकांना फोन गेला आणि आता दोन कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. आरोपींच्या वाढत्या मागणीमुळे संशय बळावलेल्या पोलिसांनी आपली तपास चक्रे गतिमान केली.
        स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथक सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाइल लोकेशनच्या आधारे अपहरणकर्त्यांचा माग काढायला लागली. बारीक सुगावा मिळाल्याने पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून पाच संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस करण्यात आली. मात्र, आरोपांनी पोलिसांना उडवाउडवीचे उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी आरोपींना “सुंदरी”चे दर्शन घडवताच पैशाच्या हव्यासापोटी गव्हाणे यांचा खून केल्याची कबुली दिली. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह चाळीसगाव घाटात फेकून दिल्याचेही पोलिसांना सांगितले. दरम्यान, २९ डिसेंबरच्या पहाटे पोलिसांनी तुकाराम गव्हाणे नामक यशस्वी व्यापाऱ्याचा झालेला ‘रक्तरंजित अंत’ जगासमोर आणला.
        या प्रकरणी सिल्लोड पोलिसांत उपरोक्त आरोपींविरुद्ध संगनमत करून अपहरण, खंडणी, खून आणि खुनाचे पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सिल्लोड पोलीस करीत आहेत.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

जागतिक वारसास्थळ ‘अजिंठा’ परिसरात देहविक्रीचा विळखा

अभिनय बोर्डे धाड, (प्रतिनिधी): जगाच्या नकाशावर आपल्या लेण्यांसाठी आणि कलेसाठी प्रसिद्ध असलेले...

३ लाखांच्या मुद्देमालासह आरोपी २४ तासांत गजाआड

खामगाव,(प्रतिनिधी):हॉटेल मालक घरी अंघोळीला गेल्याची संधी साधून हॉटेलमधील लॅपटॉप, टॅब आणि कार...

बुलढाणा जिल्हा हादरला! अवघ्या २४ तासांत पुन्हा ५ जण गायब

अजय टप मलकापूर,(प्रतिनिधी): शांतता आणि सुव्यवस्थेसाठी ओळखल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन...

खळबळजनक: ‘तू मला पसंत नाहीस, मला दुसरं लग्न करायचंय’

अजय टप  शेगाव,(प्रतिनिधी): भारतीय संस्कृतीत लग्नाला पवित्र बंधन मानले जाते, मात्र याच...