Home राजकारण बुलढाण्यात ८९ जागा जिंकुन भाजपाचे वर्चस्व
राजकारण

बुलढाण्यात ८९ जागा जिंकुन भाजपाचे वर्चस्व

  बुलढाणा,दि. २१ (प्रतिनिधी)
           मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील ११ महत्त्वाच्या नगर परिषदांचे निवडणूक निकाल आज २१ डिसेंबर र७ोजी स्पष्ट झाले. यामध्ये भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केले असून एकूण २८६ जागांपैकी ८९ जागा जिंकत भाजपा हा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर काँग्रेस ६० जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिली.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र संमिश्र कल पाहायला मिळाला. बुलढाणा नगर परिषदेत शिवसेनेच्या पूजा संजय गायकवाड यांनी बाजी मारली. तर चिखलीमध्ये भाजपाचे पंडितराव देशमुख नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. खामगावमध्ये भाजपाच्या अपर्णा फुंडकर यांनी मोठा विजय मिळवला. शेगावमध्ये काँग्रेसचे प्रकाश शेगोकार यांनी भाजपाच्या बालेकिल्ल्यात विजयाची मोहोर उमटवली. विशेष म्हणजे, सिंदखेड राजामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सौरभ विजय तायडे यांनी विजय मिळवून आपले अस्तित्व अधोरेखित केले. देऊळगाव राजामध्ये र७ाष्ट्रवादीच्या माधुरी तुषार शिपणे, जळगाव जामोदमध्ये भाजपाचे गणेश दांडगे, लोणारमध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे भूषण मापारी, नांदुऱ्यात भाजपाचे सुधीर मुऱ्हेकर, मलकापूरमध्ये अतिकुर रहेमान शफिकुर रहेमान यांनी बाजी मारली.
एकंदरीत चित्र पाहता अनेक ठिकाणी प्रस्थापित पक्षांना स्थानिक आघाड्यांनी (१७ जागा) आणि अपक्षांनी (१२ जागा) जिंकून तगडे आव्हान दिल्याचे दिसून आले. देऊळगाव राजा आणि नांदुरा सारख्या भागात आघाड्यांनी महत्त्वाची मते खेचली आहेत. तसेच एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीनेही काही जागांवर आपले खाते उघडले आहे. त्यामुळे आगामी काळात सत्तेची समीकरणे जुळवताना या लहान घटकांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. या निकालांवरून जिल्ह्यात भाजपाची पकड मजबूत दिसत असली तरी, काँग्रेस आणि शिवसेनेने अनेक ठिकाणी त्यांना कडवी झुंज दिली आहे.
भाजपाला ८९ तर कॉंग्रेसला ६० जागा
एकूण सदस्य संख्येचा विचार करता, भाजपाने ८९ जागांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. काँग्रेसने ६० जागा मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (उबाठा) मिळून एकूण ५६ जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी मिळून ३९ जागा जिंकल्या आहेत.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

आमदार श्वेताताई महाले यांच्या वाढदिवसानिमित्त मतिमंद निवासी विद्यालयात अन्नदान व धान्य वाटप

अभिनय बोर्डे धाड,(प्रतिनिधी): चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील...

चिखलीच्या प्रभाग तीन मधील आरक्षण वगळा ; रहिवाशांना तात्काळ घरकुल द्या !

चिखली, (प्रतिनिधी) : चिखली नगर परिषदेच्या विकास आराखड्यातील आरक्षण वगळून स्थानिक नागरिकांना...

महावितरणचा मनमानी कारभार थांबवा; अन्यथा कार्यालयासमोर आंदोलन : ॲड. सुनील देशमुख

अभिनय बोर्डे धाड,(प्रतिनिधी): धाड विभाग आणि परिसरातील ग्रामीण भागात महावितरणने सुरू केलेल्या...

राजकीय ‘कलगीतुरा’: चिखली-बुलढाण्यात फेसबुक वॉर!

चिखली,(प्रतिनिधी): राजकारणात कधी कोण कोणाच्या ‘आखाड्यात’ शड्डू ठोकून उतरेल याचा नेम नाही....