Home स्मार्ट बुलढाणा मलकापूरमध्ये भरधाव ट्रकच दुकानात घुसला!
स्मार्ट बुलढाणा

मलकापूरमध्ये भरधाव ट्रकच दुकानात घुसला!

अजय टप
   मलकापूर,(प्रतिनिधी) : चालकाचे नियंत्रण सुटल्याने एम एच-४०-बीसी-५६०८ क्रमांकाचा ट्रॅक थेट बुलढाणा रोडवरील रस्त्याकडेला असलेल्या छोट्या व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये घुसला. आज २७ डिसेंबरच्या पहाटे २.३० वाजताच्या सुमारास मलकापूर शहरात हा अपघात घडला. या अपघातात जीवितहानी झाली नसली तर व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
अपघात इतका जोरदार होता की रस्त्यालगत असलेली टपऱ्या, हातगाड्या व साहित्य पूर्णतः उद्ध्वस्त झाले. सुदैवाने ही घटना पहाटेच्या वेळी घडल्याने मोठी जीवितहानी टळली, मात्र संबंधित व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच मलकापूर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी ट्रॅक चालकास ताब्यात घेतले असून या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.
या घटनेमुळे बुलढाणा रोड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रस्त्यावरील अतिक्रमण आणि अवजड वाहनांच्या वेगाबाबत नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

स्वंयभू मारोती संस्थानात हनुमान जन्मोउत्सवाची महाप्रसादाने सांगता

बुलढाणा,(प्रतिनिधी): येथील स्वंयभू मारोती संस्थान येथे हनुमान जयंती निमित्त हनुमान जन्मोउत्सवाचे आयोजन...

मोताळा येथे पत्रकारांचे धरणे आंदोलन

मोताळा,(प्रतिनिधी) : पत्रकारांवरील अन्याय थांबविण्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी,...

जिल्हाधिकारी कचेरीवर धडाडला लोकशाहीचा चौथा स्तंभ! जाहिरात दरात १५० टक्के वाढीसाठी बुलढाण्यात व्हॉईस ऑफ मीडियाचे दोन तास धरणे आंदोलन

बुलढाणा,(प्रतिनिधी): “अन्यायकारक धोरणे बदला, अन्यथा वृत्तपत्र उद्योग बंद पडेल!” अशी आक्रमक भूमिका...

श्रद्धांजली: धाडचा ‘देवमाणूस’ हरपला!

सुभाष मोहिते बुलढाणा: ज्या काळात वैद्यकीय क्षेत्रात आधुनिक यंत्रणा नव्हती, फक्त नाडी...