Home स्मार्ट बुलढाणा …आता अन्न नालीत फेकल्यास होणार कारवाई
स्मार्ट बुलढाणा

…आता अन्न नालीत फेकल्यास होणार कारवाई

मोताळा,(प्रतिनिधी) :

शेतात धान्य पिकविण्यासाठी शेतकरी अहोरात्र मेहनत करतात. मात्र, त्याच अन्नाची नासधूस होवून ते नालीत फेकल्या जात असल्यामुळे सदर अन्न सडून रोगराई वाढण्याची शक्यता निर्माण होण्याची शक्यता पाहता, मोताळा तालुक्यातील तरोडा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी ॲक्शन मोडवर येत गावात दवंडी देवून अन्न नालीत टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

‘अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे’ अन्न केवळ पोट भरण्याचे साधन नाही. ते जीवन, उर्जा आणि सृष्टीचा आधार आहे. अन्नाचा आदर करावा, ते वाया घालू नये..पाहिजे तेवढेच घ्यावे योग्य प्रमाणात सेवन करावे, असे भारतीय संस्कृतीत सांगितलेले आहे. शेतात अन्न पिकविण्यासाठी शेतकरी अहोरात्र कष्ट करतात. मात्र, तरोडा गावात नाल्यांमध्ये कचरा आणि शिजविलेले अन्न टाकल्या जात असल्यामुळे रोगराई वाढण्याची शक्यता पाहता ग्रामपंचायत प्रशासन अधिकाऱ्यांनी २४ डिसेंबर रोजी दवंडीचे एक पत्रक जारी करीत शिजविलेले अन्न नालीमध्ये टाकू नये. जे नागरिक अन्न नालीमध्ये टाकतात. त्यामुळे रोगराई पसरल्यास अन्न टाकणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे संकेत त्यांना दिले आहे. हा स्वच्छतेचा एक स्तुत्य निर्णय असून या निर्णयाचे तालुक्यात कौतूक होत आहे. मात्र, रोगराई पसरल्यानंतर नालीत अन्न टाकणाऱ्यांना पकडण्याचे ग्रामपंचायत प्रशासनासमोर एक मोठे आव्हान राहिल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

स्वंयभू मारोती संस्थानात हनुमान जन्मोउत्सवाची महाप्रसादाने सांगता

बुलढाणा,(प्रतिनिधी): येथील स्वंयभू मारोती संस्थान येथे हनुमान जयंती निमित्त हनुमान जन्मोउत्सवाचे आयोजन...

मोताळा येथे पत्रकारांचे धरणे आंदोलन

मोताळा,(प्रतिनिधी) : पत्रकारांवरील अन्याय थांबविण्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी,...

जिल्हाधिकारी कचेरीवर धडाडला लोकशाहीचा चौथा स्तंभ! जाहिरात दरात १५० टक्के वाढीसाठी बुलढाण्यात व्हॉईस ऑफ मीडियाचे दोन तास धरणे आंदोलन

बुलढाणा,(प्रतिनिधी): “अन्यायकारक धोरणे बदला, अन्यथा वृत्तपत्र उद्योग बंद पडेल!” अशी आक्रमक भूमिका...

श्रद्धांजली: धाडचा ‘देवमाणूस’ हरपला!

सुभाष मोहिते बुलढाणा: ज्या काळात वैद्यकीय क्षेत्रात आधुनिक यंत्रणा नव्हती, फक्त नाडी...