Home क्राईम जगत मलकापूरचा खेबड्या खान वर्षभरासाठी स्थानबद्ध!
क्राईम जगत

मलकापूरचा खेबड्या खान वर्षभरासाठी स्थानबद्ध!

मलकापूर,(प्रतिनिधी) :

मलकापूर शहरात दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात आरोपी आरिफ खान उर्फ खेबड्या कौसर खान याच्यावर अखेर महाराष्ट्र झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली. मलकापूर शहर पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावास जिल्हाधिकाऱ्यांनी आरोपीला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी केले.

शहरातील माळीपुरा परिसरातील रहिवासी असलेला आरोपी आरिफ खान (वय २४ वर्षे) हा गेल्या २०२३ पासून गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असून त्याच्यावर मलकापूर शहर पोलीस ठाण्यात मारहाण, जीवघेणा हल्ला, शस्त्रांचा वापर, दहशत निर्माण करणे, सार्वजनिक शांततेचा भंग अशा गंभीर स्वरूपाचे एकूण ८ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिक उघडपणे तक्रार देण्यासही घाबरत असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली होती.
यापूर्वी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या वर्तनात कोणताही सुधार झाला नाही. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करणे आवश्यक असल्याचा अहवाल मलकापूर शहरचे ठाणेदार गणेश गिरी यांनी सादर केला.
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वारे यांच्या सूचनेनुसार सदर अहवाल तयार करून पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आरोपी आरिफ खान याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक गणेश गिरी,सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वारे, पोलीस अंमलदार आसिफ शेख, योगेश तायडे, संतोष कुमावत, प्रविण गवई, नवल राठोड व आनंद माने यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

जागतिक वारसास्थळ ‘अजिंठा’ परिसरात देहविक्रीचा विळखा

अभिनय बोर्डे धाड, (प्रतिनिधी): जगाच्या नकाशावर आपल्या लेण्यांसाठी आणि कलेसाठी प्रसिद्ध असलेले...

३ लाखांच्या मुद्देमालासह आरोपी २४ तासांत गजाआड

खामगाव,(प्रतिनिधी):हॉटेल मालक घरी अंघोळीला गेल्याची संधी साधून हॉटेलमधील लॅपटॉप, टॅब आणि कार...

बुलढाणा जिल्हा हादरला! अवघ्या २४ तासांत पुन्हा ५ जण गायब

अजय टप मलकापूर,(प्रतिनिधी): शांतता आणि सुव्यवस्थेसाठी ओळखल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन...

खळबळजनक: ‘तू मला पसंत नाहीस, मला दुसरं लग्न करायचंय’

अजय टप  शेगाव,(प्रतिनिधी): भारतीय संस्कृतीत लग्नाला पवित्र बंधन मानले जाते, मात्र याच...