क्राईम जगत

मनुबाई येथील महिलेस मारहाण

चिखली,(प्रतिनिधी) :
अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनुबाई (ता. चिखली) येथे कौटुंबिक वादातून महिलेस मारहाण, शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी, घरावर दगडफेक तसेच वाईट उद्देशाने पाठलाग केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अंढेरा पोलिसांत पाच जणांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
मनुबाई येथील पूजा सचिन तोडे (वय २४ वर्षे) ह्या २० डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास नऊ वर्षांचा विनोद हा भाकर मांगण्यासाठी फिर्यादीच्या घरी गेला असता, पूर्वीपासून वाद सुरू असल्याने भाकर नेऊ नये, असे सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर संबंधित मुलाने आरोपींकडे चुकीची माहिती दिल्याने आरोपी रूपाली तोडे व प्रवीण तोडे यांनी फिर्यादीच्या घरी जाऊन वाद घातला. यावेळी त्यांनी फिर्यादी व त्यांच्या नातेवाईक श्रुती यांना मारहाण केली तसेच फिर्यादीच्या छातीवर चापट मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर २१ डिसेंबर रोजी सकाळी आरोपी प्रवीण तोडे, मंगला दिनकर तोडे व रूपाली तोडे यांनी फिर्यादीच्या घरी जाऊन अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याच रात्री आरोपी प्रवीण तोडे याने फिर्यादीच्या घराच्या कड्या वाजवून दहशत निर्माण केली व घरावर दगडफेक केली. तसेच २२ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास फिर्यादी शौचालयाकडे जात असताना आरोपी प्रवीण तोडे, सुनील अंबादास तोडे व शंकर संतोष तोडे यांनी तिचा वाईट उद्देशाने पाठलाग करत, ‘तू कधीतरी आमच्या हातात येशील, कुठपर्यंत बायकांच्या आश्रयाने राहशील,’ अशा शब्दांत धमकी दिली.
या प्रकरणी पूजा सचिन तोडे यांच्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांत भारतीय न्याय संहिताचे कलम ७४, ३३३, १८९(२), १९०, १९१, ११५(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार भारत पोफळे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *