Home स्मार्ट बुलढाणा बिबट्याच्या हल्ल्यात बोकड ठार
स्मार्ट बुलढाणा

बिबट्याच्या हल्ल्यात बोकड ठार

मोताळा,(प्रतिनिधी) :
मोताळा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात बिबट्यांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहे. २३ डिसेंबर रोजी सायंकाळी बिबट्याने तळणी येथील गावापासून दीड ते २ किलो मीटर अंतरावर असलेल्या शेतशिवारात बोकड्यावर हल्ला चढवित त्याचा फडशा पाडला. त्यामुळे शेतकऱ्याचे १० हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तळणी गावातील हनुमान नगर येथील कुसुमबाई पांडुरंग तायडे व गजानन बावस्कार हे २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता दरम्यान तळणी शिवारात बकऱ्या चारत होते. दरम्यान, अचानक आलेल्या बिबट्याने कुसुमबाई तायडे यांच्या बोकड्यावर हल्ला चढवित त्याचा फडशा पाडला. बोकड्याला बिबट्या ओढत नेत असतांना कुसुमबाई व गजानन यांनी मोठ-मोठ्याने आरडा-ओरड केल्यामुळे बिबट्याने घटनास्थळावरुन पळ काढला. मात्र, बोकड तोपर्यंत मृत्यूमुखी पडला होता. यामुळे कुसुमबाई यांचे १० हजारांचे नुकसान झाले आहे. तळणी परिसरात दोन ते तीन बिबट्यांचा वावर असल्याची गावात चर्चा आहे. याकडे मोताळा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देवून सदर हिस्त्रप्राणी बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पशुपालक शेतकऱ्यांकडून होत आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

स्वंयभू मारोती संस्थानात हनुमान जन्मोउत्सवाची महाप्रसादाने सांगता

बुलढाणा,(प्रतिनिधी): येथील स्वंयभू मारोती संस्थान येथे हनुमान जयंती निमित्त हनुमान जन्मोउत्सवाचे आयोजन...

मोताळा येथे पत्रकारांचे धरणे आंदोलन

मोताळा,(प्रतिनिधी) : पत्रकारांवरील अन्याय थांबविण्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी,...

जिल्हाधिकारी कचेरीवर धडाडला लोकशाहीचा चौथा स्तंभ! जाहिरात दरात १५० टक्के वाढीसाठी बुलढाण्यात व्हॉईस ऑफ मीडियाचे दोन तास धरणे आंदोलन

बुलढाणा,(प्रतिनिधी): “अन्यायकारक धोरणे बदला, अन्यथा वृत्तपत्र उद्योग बंद पडेल!” अशी आक्रमक भूमिका...

श्रद्धांजली: धाडचा ‘देवमाणूस’ हरपला!

सुभाष मोहिते बुलढाणा: ज्या काळात वैद्यकीय क्षेत्रात आधुनिक यंत्रणा नव्हती, फक्त नाडी...