Home क्राईम जगत “एमआयएम” उमेदवाराच्या अश्लील ‘डीपफेक’ व्हिडिओमूळे खळबळ
क्राईम जगत

“एमआयएम” उमेदवाराच्या अश्लील ‘डीपफेक’ व्हिडिओमूळे खळबळ

छत्रपती संभाजीनगर,(प्रतिनिधी): छत्रपती संभाजीनगरच्या सिडको एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत एका “एमआयएम” उमेदवाराची एआयद्वारे बदनामी केल्याचा गलिच्छ प्रकार समोर आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रगतीसाठी करण्याऐवजी अत्यंत खालच्या पातळीच्या राजकारणासाठी केल्या जात असल्याचे या घटनेवरून उघड झाले असून पोलिसांनी या प्रकरणी आरोपी तौफिक कुरेशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या असून राजकीय वातावरण चांगले तापले आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांची एकमेकांवर चिखलफेक सुरू असून हल्ल्यांपर्यंत मजल गेल्याचे गेल्या आठवड्यात एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर झालेल्या हल्ल्यातून दिसून आले. दरम्यान, कुरघोडीच्या या राजकारणात आज १४ जानेवारी रोजी नवीनच प्रकार समोर आला आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभ्या असलेला शहरातील एक ३५ वर्षीय तरुण १३ जानेवारीच्या रात्री साडेदहाच्या सुमारास त्याच्या संपर्क कार्यालयात बसलेला असताना, त्याच्याच ओळखीतील एका व्यक्तीने त्याच्या व्हॉट्सॲपवर एक व्हिडिओ पाठवला. सदर व्हिडिओ पाहिल्यानंतर उमेदवार तरुणाला मोठा धक्का बसला. कोण्यातरी अज्ञात व्यक्तीने एआय तंत्रज्ञानाचा वापर करून उमेदवार तरुणाचा चेहरा एका अश्लील व्हिडिओवर लावून “क्या आपको ऐसे उम्मीदवार को चुनकर देना चाहिए?”, असा बदनामीकारक मजकूर लिहिला. तसेच तौफिक कुरेशी नावाच्या व्यक्तीने सदर व्हिडिओ अनेक व्हॉट्सॲप ग्रुपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल केल्याची बाबही समोर आली आहे.
या प्रकरणी सदर उमेदवार तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून सिडको एमआयडीसी पोलिसांनी आरोपी तौफिक कुरेशी याच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भारत पाचोळे हे करीत आहेत. दरम्यान, सदर व्हिडिओ केवळ बदनामीसाठी नसून मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण करून निवडणुकीच्या निकालावर परिणाम करण्यासाठी जाणीवपूर्वक पसरवण्यात आल्याचा आरोप उमेदवाराने केला आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

क्राईम जगत

जागतिक वारसास्थळ ‘अजिंठा’ परिसरात देहविक्रीचा विळखा

अभिनय बोर्डे धाड, (प्रतिनिधी): जगाच्या नकाशावर आपल्या लेण्यांसाठी आणि कलेसाठी प्रसिद्ध असलेले...

क्राईम जगत

३ लाखांच्या मुद्देमालासह आरोपी २४ तासांत गजाआड

खामगाव,(प्रतिनिधी):हॉटेल मालक घरी अंघोळीला गेल्याची संधी साधून हॉटेलमधील लॅपटॉप, टॅब आणि कार...

क्राईम जगत

बुलढाणा जिल्हा हादरला! अवघ्या २४ तासांत पुन्हा ५ जण गायब

अजय टप मलकापूर,(प्रतिनिधी): शांतता आणि सुव्यवस्थेसाठी ओळखल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन...

क्राईम जगत

खळबळजनक: ‘तू मला पसंत नाहीस, मला दुसरं लग्न करायचंय’

अजय टप  शेगाव,(प्रतिनिधी): भारतीय संस्कृतीत लग्नाला पवित्र बंधन मानले जाते, मात्र याच...