पिंपळगाव देवी येथील माता जगदंबेचे स्थान अत्यंत जागृत असल्याची भाविकांची श्रध्दा आहे. यात्रेच्या निमित्ताने मंदिर परिसरात भक्तीचे वातावरण असून देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यात्रेच्या या मंगल प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व माळेगाव जि.प. शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष कडू हिवाळे यांनी पिंपळगाव देवीला भेट देऊन माता जगदंबेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गावचे सरपंच गणेश वाघ आणि शिवसेना (शिंदे गट) युवा तालुका उपप्रमुख राहुल तेजराव पाटील यांची भेट घेऊन यात्रेच्या नियोजनाबाबत चर्चा केली. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य भोजराज पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी यात्रेतील विविध व्यवस्थांची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला.
सजलेली मोठी बाजारपेठ. आकाशपाळणे, ब्रेक डान्स आणि लहान मुलांसाठी विविध प्रकारचे पाळणे यात्रेचे मुख्य आकर्षण ठरत आहेत. आकर्षक खेळण्यांच्या दुकानांनी यात्रेची शोभा अधीकच वाढवली असून मुलांची मोठी गर्दी या ठिकाणी दिसून येत आहे. मिठाई, गृहोपयोगी वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांमुळे यात्रेत मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. माता जगदंबेच्या दर्शनाने भाविक तृप्त होत असून, मनोरंजनाच्या साधनांमुळे ग्रामस्थ आणि मुलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यात्रेच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत प्रशासन आणि यात्रा कमिटी परिश्रम घेत आहे.
बुलढाणा,(प्रतिनिधी): येथील स्वंयभू मारोती संस्थान येथे हनुमान जयंती निमित्त हनुमान जन्मोउत्सवाचे आयोजन...
ByWeekly vartaApril 2, 2026मोताळा,(प्रतिनिधी) : पत्रकारांवरील अन्याय थांबविण्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी,...
ByWeekly vartaApril 1, 2026बुलढाणा,(प्रतिनिधी): “अन्यायकारक धोरणे बदला, अन्यथा वृत्तपत्र उद्योग बंद पडेल!” अशी आक्रमक भूमिका...
ByWeekly vartaApril 1, 2026सुभाष मोहिते बुलढाणा: ज्या काळात वैद्यकीय क्षेत्रात आधुनिक यंत्रणा नव्हती, फक्त नाडी...
ByWeekly vartaApril 1, 2026
Leave a comment