Home स्मार्ट बुलढाणा शाब्बास बुलढाणा पोलीस: १० लाखांचे ५४ हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत
स्मार्ट बुलढाणा

शाब्बास बुलढाणा पोलीस: १० लाखांचे ५४ हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत

बुलढाणा,(प्रतिनिधी): पोलीस अधीक्षक नीलेश तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात बुलढाणा पोलीस दलाच्या सध्या कौतुकास्पद कामगिरी कामगिऱ्या सुरू आहेत. अशीच एक कौतुकास्पद कामगिरी बुलढाणा शहर पोलिसांनी पार पाडली. तांत्रिक कौशल्याचा वापर करून पोलिसांनी हरवलेले एकूण ५४ मोबाइल संच हस्तगत करत मूळ मालकांना सुपूर्द केले. हरवलेले महागडे मोबाइल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
आजच्या या धावपळीच्या युगात मोबाइल हरवणे म्हणजे फार मोठी समस्या बनली आहे. मात्र, यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या Central Equipment Identity Register नावाचे पोर्टल सुरू केलेले आहे. या पोर्टलचा प्रभावी वापर करत पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनात बुलढाणा शहर ठाणेदार रवी राठोड, CEIR पोर्टलचे कामकाज पाहणारे पोलीस उपनिरीक्षक रवि मोरे, पोलीस अंमलदार युवराज शिंदे, दिपक चव्हाण, विनोद बोरे, मनोज सोनुने आणि महिला पोलीस अंमलदार मोहिनी चव्हाण यांनी मागील महिनाभरात पोर्टलच्या माध्यमातून ३८ तर तांत्रिक तपासाच्या माध्यमातून १६ मोबाइल, असे एकूण ५४ विविध कंपन्यांचे मोबाइल संच शोधून काढले. हस्तगत करण्यात आलेले हे मोबाइल मूळ मालकांचा शोध घेऊन त्यांना परत करण्यात आले.
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, प्रो. आयपीएस आदित्य सिंग, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला. पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास दृढ झाला आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

स्वंयभू मारोती संस्थानात हनुमान जन्मोउत्सवाची महाप्रसादाने सांगता

बुलढाणा,(प्रतिनिधी): येथील स्वंयभू मारोती संस्थान येथे हनुमान जयंती निमित्त हनुमान जन्मोउत्सवाचे आयोजन...

मोताळा येथे पत्रकारांचे धरणे आंदोलन

मोताळा,(प्रतिनिधी) : पत्रकारांवरील अन्याय थांबविण्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी,...

जिल्हाधिकारी कचेरीवर धडाडला लोकशाहीचा चौथा स्तंभ! जाहिरात दरात १५० टक्के वाढीसाठी बुलढाण्यात व्हॉईस ऑफ मीडियाचे दोन तास धरणे आंदोलन

बुलढाणा,(प्रतिनिधी): “अन्यायकारक धोरणे बदला, अन्यथा वृत्तपत्र उद्योग बंद पडेल!” अशी आक्रमक भूमिका...

श्रद्धांजली: धाडचा ‘देवमाणूस’ हरपला!

सुभाष मोहिते बुलढाणा: ज्या काळात वैद्यकीय क्षेत्रात आधुनिक यंत्रणा नव्हती, फक्त नाडी...