Home खेळ व मनोरंजन बुलढाण्याच्या म्हस्के कुटुंबात “हिमालयान”चा डॅश! 
खेळ व मनोरंजन

बुलढाण्याच्या म्हस्के कुटुंबात “हिमालयान”चा डॅश! 

बुलढाणा,(प्रतिनिधी): बुलढाण्याच्या पत्रकारितेच्या क्षेत्रात आपल्या आक्रमक शैलीने ओळख निर्माण करणारे “व्हॉईस ऑफ मीडिया”चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा दैनिक “पुण्यनगरी”चे जिल्हा प्रतिनिधी अनिल म्हस्के यांनी आता साहित्यासोबतच साहसाच्या क्षेत्रातही एक नवा पायंडा पाडला आहे. बुलढाणा जिल्ह्यात पहिली रॉयल एनफील्ड “हिमालयान” ही रायडर बाईक आणण्याचा बहुमान त्यांनी पटकावला असून त्यांच्या या नव्या “स्वारी”ची जिल्ह्यात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
पत्रकार अनिल म्हस्के हे केवळ लेखणीच्या माध्यमातूनच नव्हे, तर आपल्या अनोख्या कामाच्या धडाक्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. पत्रकार असो, किंवा सामान्य नागरिक, यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला आपल्या लेखणीतूनच नाहीतर अनोख्या अंदाजात मार्गी लावणे, ही त्यांची खासियत आहे. त्याच्या या कार्याला आता अधिक वेग देण्यासाठी त्यांनी डोंगर-दऱ्या गाजवणारी “हिमालयान” ही शक्तिशाली बाईक निवडली आहे.
विशेष म्हणजे, ही अत्याधुनिक फिचर्स असलेली “हिमालयान” बाईक बुलढाणा जिल्ह्यात आणणारे ते पहिलेच व्यक्ती ठरले आहेत. रायडिंगच्या दुनियेत मानाचे स्थान असलेल्या या गाडीमुळे म्हस्के यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून त्यांच्या या नव्या बाईकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच, पत्रकारिता क्षेत्रातून आणि त्यांच्या मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. “आता लेखणीसोबतच हिमालयानचा वेग जिल्ह्याच्या विकासासाठी धावेल,” अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले जात आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Categories

Related Articles

क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबिर उत्कृष्ट खेळाडू घडविण्याचे व्यासपीठ : मेघा बाहेकर

बुलढाणा,(प्रतिनिधी): उन्हाळी सुटीचा सदुपयोग करून मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्यातील...

कराचीच्या गल्लीबोळातही रणवीर सिंगच्या नावाची चर्चा; नेमकं कारण काय?

मुंबई,(प्रतिनिधी): भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात काही चित्रपट असे येतात, जे केवळ पडद्यावर चालत...

बुलढाण्यात घुमली ‘अस्मिता’ तलवारबाजीची गर्जना!

बुलढाणा,(प्रतिनिधी): क्रीडा क्षेत्रातील महिलांच्या सहभागाला नवा आयाम देण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया’...

IPL 2026 चा थरार: मैदानावर रन्सचा पाऊस, पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ

मुंबई,(प्रतिनिधी) : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) चा हंगाम आता खऱ्या अर्थाने...