Home स्मार्ट बुलढाणा खामगाव ब्रेकिंग: शिक्षकाकडून विद्यार्थ्याला अमानुष मारहाण
स्मार्ट बुलढाणा

खामगाव ब्रेकिंग: शिक्षकाकडून विद्यार्थ्याला अमानुष मारहाण

खामगाव, (प्रतिनिधी): आपल्या देशात शिक्षणाला “पवित्र मंदिर” आणि शिक्षकाला “मार्गदर्शक” मानतात. मात्र, खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद शाळेत एका १० वर्षीय विद्यार्थ्याला शिक्षकाने केवळ प्रश्नाचे उत्तर देता आले नाही, म्हणून अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे खळबळ माजली असून पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद शाळेत पवन नारायण इंगळे हा १० वर्षांचा मुलगा चौथ्या वर्गात शिक्षण घेत आहे. शाळेत अध्यापन सुरू असताना पवनला शिक्षक रवींद्र चीम यांनी एक प्रश्न विचारला. पवनला सदर प्रश्नाचे उत्तर न देता आल्याने शिक्षक चीम यांचा संयम सुटला. मागचा पुढचा विचार न करता त्यांनी हातातील स्केल पट्टीने पवनला अमानुष मारहाण केली. मारहाणीमुळे पवनच्या अंगावर वळ उमटले असून त्याला दुखापत देखील झाली. पवनने घरी गेल्यानंतर सदर प्रकार आपल्या पालकांना सांगितला.
पालकांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल असून सध्या त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव राजा पोलिसांनी रुग्णालयात पोहोचून पीडित मुलाचा जबाब नोंदवून नोंदविला असून वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर शिक्षकावर गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शिक्षण क्षेत्रावर प्रश्नचिन्ह
कायद्याने विद्यार्थ्यांना शारीरिक दंड देण्यावर शाळांना बंदी घातलेली आहे. पवनला अशा प्रकारे अमानुष मारहाण झाल्याने शिक्षण क्षेत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून आरोपी शिक्षक रवींद्र चीम यांच्यावर केवळ निलंबन नाही, तर कठोर फौजदारी कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी पवनच्या पालकांसह गावकऱ्यांनी केली आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

स्वंयभू मारोती संस्थानात हनुमान जन्मोउत्सवाची महाप्रसादाने सांगता

बुलढाणा,(प्रतिनिधी): येथील स्वंयभू मारोती संस्थान येथे हनुमान जयंती निमित्त हनुमान जन्मोउत्सवाचे आयोजन...

मोताळा येथे पत्रकारांचे धरणे आंदोलन

मोताळा,(प्रतिनिधी) : पत्रकारांवरील अन्याय थांबविण्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी,...

जिल्हाधिकारी कचेरीवर धडाडला लोकशाहीचा चौथा स्तंभ! जाहिरात दरात १५० टक्के वाढीसाठी बुलढाण्यात व्हॉईस ऑफ मीडियाचे दोन तास धरणे आंदोलन

बुलढाणा,(प्रतिनिधी): “अन्यायकारक धोरणे बदला, अन्यथा वृत्तपत्र उद्योग बंद पडेल!” अशी आक्रमक भूमिका...

श्रद्धांजली: धाडचा ‘देवमाणूस’ हरपला!

सुभाष मोहिते बुलढाणा: ज्या काळात वैद्यकीय क्षेत्रात आधुनिक यंत्रणा नव्हती, फक्त नाडी...