दरम्यान, शिक्षकांशी संपर्क साधला असता, आपण मेडिकल सुट्टीवर असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, शाळा प्रशासनाकडून चौकशी केली असता, संबंधित शिक्षकांनी कोणताही मेडिकल सुट्टीचा अर्ज अथवा वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर बसत आहे.या प्रकारास शिक्षक निलेश जाधव पूर्णत: जबाबदार असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली केल्याप्रकरणी त्यांच्यावर त्वरित शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी ठाम मागणी शालेय व्यवस्थापन समितीने केली आहे. तसेच २३ जानेवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांना दिलेल्या निवेदनात, तीन दिवसांच्या आत शिक्षक शाळेवर रुजू न झाल्यास चिंचपूर येथील जिल्हा परिषद शाळा बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. प्रशासनाच्या या धोरणापाही विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान पाहून संतापलेल्या पालकांनी मोठे आंदोलन उभारल्यास आश्चर्य वाटायला नको, म्हणजे झाले!
बुलढाणा,(प्रतिनिधी): येथील स्वंयभू मारोती संस्थान येथे हनुमान जयंती निमित्त हनुमान जन्मोउत्सवाचे आयोजन...
ByWeekly vartaApril 2, 2026मोताळा,(प्रतिनिधी) : पत्रकारांवरील अन्याय थांबविण्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी,...
ByWeekly vartaApril 1, 2026बुलढाणा,(प्रतिनिधी): “अन्यायकारक धोरणे बदला, अन्यथा वृत्तपत्र उद्योग बंद पडेल!” अशी आक्रमक भूमिका...
ByWeekly vartaApril 1, 2026सुभाष मोहिते बुलढाणा: ज्या काळात वैद्यकीय क्षेत्रात आधुनिक यंत्रणा नव्हती, फक्त नाडी...
ByWeekly vartaApril 1, 2026
Leave a comment