Home क्राईम जगत काजेगावमधून २१ वर्षीय तरुणी बेपत्ता
क्राईम जगत

काजेगावमधून २१ वर्षीय तरुणी बेपत्ता

अजय टप
जळगाव जामोद: गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात मुली आणि तरुणी बेपत्ता होण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. २८ जानेवारी रोजी मलकापूर शहरातून तरुणी बेपत्ता झाल्याची घटना ताजी असतानाच, याच दिवशी काजेगाव (ता.जळगाव जामोद) येथूनही एक २१ वर्षीय तरुणी घरातून अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली. त्यामुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांत हरवल्याची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
जळगाव जामोद तालुक्यात येणाऱ्या काजेगाव येथील रहिवासी असलेले दादाराव वामन धंदर (वय ५४ वर्षे) यांना साक्षी दादाराव धंदर (वय २१ वर्षे) नावाची मुलगी आहे. २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान दादाराव आणि त्यांचे कुटुंब कामानिमित्त बाहेर गेलेले होते. तर त्यांची मुलगी साक्षी ही एकटीच घरी होती. घरात कुणीही नसताना ती कोठेतरी निघून गेली. कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांना मुलगी घरात नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी साक्षीचा गावात, परिसरात आणि सर्व नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र, दोन दिवस उलटूनही तिचा कोणताही थांगपत्ता लागला नाही.
दरम्यान, दादाराव धंदर यांनी आज ३० जानेवारी रोजी जळगाव जामोद पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी हरवल्याची नोंद केली आहे. साक्षीचा रंग निमगोरा, उंची ५ फूट २ इंच, केस काळे आणि लांब, बांधा मध्यम असून तिने अंगात पांढऱ्या रंगाची सलवार आणि पिवळ्या रंगाचा टॉप परिधान केलेला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस अंमलदार भागवत उबरहंडे हे करीत आहेत. वरील वर्णनाच्या तरुणीबाबत काही माहिती मिळाल्यास जळगाव जामोद पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

जागतिक वारसास्थळ ‘अजिंठा’ परिसरात देहविक्रीचा विळखा

अभिनय बोर्डे धाड, (प्रतिनिधी): जगाच्या नकाशावर आपल्या लेण्यांसाठी आणि कलेसाठी प्रसिद्ध असलेले...

३ लाखांच्या मुद्देमालासह आरोपी २४ तासांत गजाआड

खामगाव,(प्रतिनिधी):हॉटेल मालक घरी अंघोळीला गेल्याची संधी साधून हॉटेलमधील लॅपटॉप, टॅब आणि कार...

बुलढाणा जिल्हा हादरला! अवघ्या २४ तासांत पुन्हा ५ जण गायब

अजय टप मलकापूर,(प्रतिनिधी): शांतता आणि सुव्यवस्थेसाठी ओळखल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन...

खळबळजनक: ‘तू मला पसंत नाहीस, मला दुसरं लग्न करायचंय’

अजय टप  शेगाव,(प्रतिनिधी): भारतीय संस्कृतीत लग्नाला पवित्र बंधन मानले जाते, मात्र याच...