Home क्राईम जगत सासर्‍याचा सुनेवर विळ्याने हल्ला
क्राईम जगत

सासर्‍याचा सुनेवर विळ्याने हल्ला

अजय टप

खामगाव (प्रतिनिधी): घराचे बांधकाम आणि जमिनीच्या वादातून झालेल्या हिंसक हाणामारीत चुलत सासऱ्याने आपल्या सुनेवर विळ्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना (हिंगणा कारेगाव ता.खामगाव ) येथे घडली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हिंगणा कारेगाव येथील मायावती सुपाजी जाधव (वय ३० वर्षे) या ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास आपल्या घरासमोर बांधलेल्या कॉलममध्ये माती ओढण्याचे काम करत होत्या. त्यावेळी त्यांचे नातेवाईक असलेल्या अंजनाबाई जगन जाधव आणि जगन नामदेव जाधव हे सदर ठिकाणी गेले. मायावती यांच्यासोबत जागेचा वाद उकरून काढत आरोपी अंजनाबाई यांनी कॉलममध्ये उडी घेतली. जोपर्यंत या जागेचा निर्णय लागत नाही, तोपर्यंत इथे माती टाकायची नाही, तसेच कोणतेही काम करायचे नाही, असे म्हणत वाद घालायला सुरुवात केली. ही बाब सहन न झाल्याने अंजनाबाई यांनी रागाच्या भरात स्वतःचे डोके दगडावर आपटून घेत आरडाओरडा केला. अंजनाबाई यांचे डोके फुटलेले पाहून आरोपी जगन नामदेव जाधव हे हातात विळा घेऊन घटनास्थळी गेले आणि संतापाच्या भरात विळ्याने मायावती जाधव यांच्या डाव्या हातावर वार केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू आणि जखमी अवस्थेतच त्यांनी पोलीस स्टेशन गाठले.

या प्रकरणी मायावती जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांत उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ११८ (१), ३५२, ३५१ (२), ३५१ (३) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार किरण राऊत हे करीत आहेत.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

जागतिक वारसास्थळ ‘अजिंठा’ परिसरात देहविक्रीचा विळखा

अभिनय बोर्डे धाड, (प्रतिनिधी): जगाच्या नकाशावर आपल्या लेण्यांसाठी आणि कलेसाठी प्रसिद्ध असलेले...

३ लाखांच्या मुद्देमालासह आरोपी २४ तासांत गजाआड

खामगाव,(प्रतिनिधी):हॉटेल मालक घरी अंघोळीला गेल्याची संधी साधून हॉटेलमधील लॅपटॉप, टॅब आणि कार...

बुलढाणा जिल्हा हादरला! अवघ्या २४ तासांत पुन्हा ५ जण गायब

अजय टप मलकापूर,(प्रतिनिधी): शांतता आणि सुव्यवस्थेसाठी ओळखल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन...

खळबळजनक: ‘तू मला पसंत नाहीस, मला दुसरं लग्न करायचंय’

अजय टप  शेगाव,(प्रतिनिधी): भारतीय संस्कृतीत लग्नाला पवित्र बंधन मानले जाते, मात्र याच...