Home क्राईम जगत खळबळजनक: “त्या” बेपत्ता मुलीच्या बापाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम जगत

खळबळजनक: “त्या” बेपत्ता मुलीच्या बापाचा आत्महत्येचा प्रयत्न

अभिनय बोर्डे
धाड (प्रतिनिधी): धाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या करडी येथील एका नामांकित विद्यालयातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची ४ फेब्रुवारी रोजी घडली होती. या संदर्भात धाड पोलिसांत अपहरणाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला. मात्र, हा धक्का सहन न झाल्याने पीडित मुलीच्या बापाने ५ फेब्रुवारी रोजी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे धाड परिसरात संताप व्यक्त होत आहे.
धाडवरून छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आणि निजाम काळापासून बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका गावातील १७ वर्षे ६ महिने वयाची मुलगी “कुमारी मनिषा” (नाव बदललेले आहे) ही ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास करडी (धाड) येथील विद्यालयात आपल्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी आली होती. मात्र, सायंकाळचे ५.३० वाजल्यानंतरही मनिषा घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती कुठेच मिळून न आल्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून आणि फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी धाड पोलिसांत दिली होती. पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला आहे.
दरम्यान, आपली लाडकी लेक बेपत्ता झाल्याचे दुःख आणि दुसरीकडे समाजात बदनामी होईल, या भीतीपोटी हतबल झालेल्या पीडित मुलीच्या वडिलांनी टोकाचे पाऊल उचलत विषारी औषध प्राशन केले. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने धाड येथील ग्रामीण रुग्णालयात आणि त्यानंतर अधिक उपचारासाठी बुलढाणा येथे हलविले. काबाडकष्ट करून, तर कधी स्वतः उपाशी राहून लेकीच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी आयुष्य वेचले,अशा पाल्ल्याने अजाणतेपणी उचललेल्या पावलामुळे पालकांची काय अवस्था होते, याची प्रचिती या घटनेवरुन येत आहे. ही घटना केवळ एका कुटुंबाची नसून समाजाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे.
कायद्याच्या धाकासोबतच संवाद महत्वाचा
वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याआधीच अशा प्रकारे आमिषाला बळी पडणाऱ्या मुलींना कदाचित त्यांच्या एका चुकीच्या निर्णयाचा परिणाम आपल्या जन्मदात्यांवर काय होईल, याची पुसटशी कल्पनाही नसते. रक्ताचे पाणी करून मुलीला शिकवणाऱ्या बापावरच मृत्यूशी झुंज देण्याची वेळ येते, ही शोकांतिका आहे. समाजात फोफावल्या या विकृतीला ठेचून काढण्यासाठी केवळ कायद्याचा धाक असून चालणार नाही, तर आपल्या पाल्यांसोबत पालकांचा संवाद असणे तितकेच गरजेचे आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

जागतिक वारसास्थळ ‘अजिंठा’ परिसरात देहविक्रीचा विळखा

अभिनय बोर्डे धाड, (प्रतिनिधी): जगाच्या नकाशावर आपल्या लेण्यांसाठी आणि कलेसाठी प्रसिद्ध असलेले...

३ लाखांच्या मुद्देमालासह आरोपी २४ तासांत गजाआड

खामगाव,(प्रतिनिधी):हॉटेल मालक घरी अंघोळीला गेल्याची संधी साधून हॉटेलमधील लॅपटॉप, टॅब आणि कार...

बुलढाणा जिल्हा हादरला! अवघ्या २४ तासांत पुन्हा ५ जण गायब

अजय टप मलकापूर,(प्रतिनिधी): शांतता आणि सुव्यवस्थेसाठी ओळखल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन...

खळबळजनक: ‘तू मला पसंत नाहीस, मला दुसरं लग्न करायचंय’

अजय टप  शेगाव,(प्रतिनिधी): भारतीय संस्कृतीत लग्नाला पवित्र बंधन मानले जाते, मात्र याच...