Home स्मार्ट बुलढाणा मासरुळनगरीत संत गजानन महाराज प्रगटदिन उत्साहात
स्मार्ट बुलढाणा

मासरुळनगरीत संत गजानन महाराज प्रगटदिन उत्साहात

किरण देशमुख

मासरुळ,(प्रतिनिधी): येथे संत गजानन महाराज यांचा १४८ वा प्रगटदिनानिमित्त त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह पार पडला. यामध्ये गजानन महाराज विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण, तसेच ६ फेब्रुवारी रोजी हभप अजबराव महाराज मिरगे, ७ फेब्रुवारी रोजी हभप संतोष महाराज आढावणे, तर फेब्रुवारी रोजी सांप्रदायिक भजनी मंडळाचा कार्यक्रम व तद्नंतर महाप्रसाद वितरण करण्यात आले.

संत गजानन महाराज यांच्या प्रगटदिनी सकाळी सात वाजता आरती करून गावांमधुन पालखी सोहळा काढून उत्सव साजरा करण्यात आला. दिंडीमध्ये बालगोपाल मंडळी वारकरी पोशाखामध्ये तसेच महिला भजनी मंडळ शिव भजनी मंडळ व समस्त गावकरी मंडळी सर्व मंडळींनी भारुड, भजन व फुगडीचा मनमुराद आनंद घेतला. शेगावचे गजानन महाराज हे महान संत होते. दत्तसंप्रदायातील योगी म्हणून त्यांना ओळखले जाते. १८७८ फेब्रुवारी महिन्यात गजानन महाराज विदर्भातील शेगाव येथे दिगंबर अवस्थेत तारुण्यात पहिल्यांदा भक्तांना दिसले. त्यांनी कायम लोकांना सेवाभाव शिकवला. आपल्या लीलांनी अनेक चमत्कार गजानन महाराजांनी केले.महाराजांना लोक भगवान गणेशाचा अवतार देखील मनात असत. कोणतेही अवडंबर न करता केवळ भक्तिमार्गाने देवापर्यंत पोहोचता येते हेच त्यांनी दाखवले. ‘गण गण गणात बोते’ हा मंत्र जगाला देणारे अवलिया महान संत गजानन महाराज यांचा उद्या ८ फेब्रुवारी रोजी प्रकगदिन सोहळा असल्याने जिकडे तिकडे हा उत्सव मोठ्या थाटामाटात पार पडला. मासरुळ येथेही हा उत्सव आनंदात पार पडला. उत्सवासाठी गजानन महाराज सेवा समिती व समस्त गावकरी मंडळी मासरुळ यांनी परिश्रम घेतले.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

स्वंयभू मारोती संस्थानात हनुमान जन्मोउत्सवाची महाप्रसादाने सांगता

बुलढाणा,(प्रतिनिधी): येथील स्वंयभू मारोती संस्थान येथे हनुमान जयंती निमित्त हनुमान जन्मोउत्सवाचे आयोजन...

मोताळा येथे पत्रकारांचे धरणे आंदोलन

मोताळा,(प्रतिनिधी) : पत्रकारांवरील अन्याय थांबविण्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी,...

जिल्हाधिकारी कचेरीवर धडाडला लोकशाहीचा चौथा स्तंभ! जाहिरात दरात १५० टक्के वाढीसाठी बुलढाण्यात व्हॉईस ऑफ मीडियाचे दोन तास धरणे आंदोलन

बुलढाणा,(प्रतिनिधी): “अन्यायकारक धोरणे बदला, अन्यथा वृत्तपत्र उद्योग बंद पडेल!” अशी आक्रमक भूमिका...

श्रद्धांजली: धाडचा ‘देवमाणूस’ हरपला!

सुभाष मोहिते बुलढाणा: ज्या काळात वैद्यकीय क्षेत्रात आधुनिक यंत्रणा नव्हती, फक्त नाडी...