Home स्मार्ट बुलढाणा गांजा तस्कर पोलीस अंमलदाराची गचाळपट्टी
स्मार्ट बुलढाणा

गांजा तस्कर पोलीस अंमलदाराची गचाळपट्टी

बुलढाणा,(प्रतिनिधी): पोलीस दल हे जनतेच्या सेवेसाठी आहे, गुन्हेगारांच्या मदतीसाठी नाही. “मिशन परिवर्तन” हे जिल्ह्याच्या हितासाठी आहे आणि त्या आड येणारा, मग तो सामान्य नागरिक असो वा वर्दीतील अधिकारी, अशा प्रवृत्तींना दलात स्थान नाही, हे स्पष्ट करत पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी आरोपी पोलीस अंमलदाराला थेट सेवेतून बडतर्फ केले. त्यांची ही कारवाई म्हणजे खाकीत राहून खाकीशी द्रोह करणाऱ्यांसाठी मोठा धडा मानला जात आहे.

मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याला व्यसनमुक्त करण्यासाठी “मिशन परिवर्तन” ही संकल्पना राबवून लोकांच्या मनात आदराचे स्थान मिळवणाऱ्या पोलीस दलात, एका कर्मचाऱ्याने गद्दारी करण्याचा प्रयत्न केल्याच बाब समोर आली. छत्तीसगड पोलिसांनी केलेल्या एका मोठ्या कारवाईत गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा पोलीस नियंत्रण कक्षातील कर्मचारी प्रदीप मुसादवाले याचे नाव समोर आले होते. ४ कोटी ७५ लाखांच्या गांजा तस्करीच्या या गोरखधंद्यात मुसादवालेचा सहभाग असल्याचे आढळून आल्याने बुलढाणा पोलीस दलाची मान खाली गेली होती. मात्र, हे प्रकरण समोर येताच पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी “चुकीला माफी नाही”, म्हणत कोणताही विलंब न लावता, शिस्तीचे उल्लंघन करत गंभीर गुन्हेगारी कृत्याबद्दल संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ सेवेतून बडतर्फ केल्याचे आदेश पारित केले. त्यांच्या या आदेशामुळे चुकीचे कृत्य करणाऱ्याला “वर्दी”चे संरक्षण मिळणार नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

“मिशन परिवर्तन”चा डंका कायम!

पोलीस अधीक्षक नीलेश तांबे निडर,निःस्वार्थ आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. बुलढाणा जिल्ह्याला नशामुक्त करण्यासाठी या अधिकाऱ्याने “मिशन परिवर्तन”, ही मोहीम सुरू केली. नव्हेतर या मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील तरुणांमध्ये जनजागृती करत आहे. त्यामुळे या एका घटनेमुळे या मोहिमेचे महत्त्व कमी होणार नाही, उलट अशा कारवाईमुळे ही मोहीम आता अधिक शुद्ध आणि पारदर्शक झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यामुळे संपूर्ण पोलीस दलाच्या प्रामाणिक मेहनतीवर पाणी फेरले जाऊ नये, यासाठी पोलीस अधीक्षक तांबे यांनी राबवलेली ही “क्लीन अप” मोहीम आणि त्यांचा बेधडक निर्णय, यामुळे सर्वसामान्य जनतेचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे, एवढे मात्र निश्चित!

 

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

स्वंयभू मारोती संस्थानात हनुमान जन्मोउत्सवाची महाप्रसादाने सांगता

बुलढाणा,(प्रतिनिधी): येथील स्वंयभू मारोती संस्थान येथे हनुमान जयंती निमित्त हनुमान जन्मोउत्सवाचे आयोजन...

मोताळा येथे पत्रकारांचे धरणे आंदोलन

मोताळा,(प्रतिनिधी) : पत्रकारांवरील अन्याय थांबविण्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी,...

जिल्हाधिकारी कचेरीवर धडाडला लोकशाहीचा चौथा स्तंभ! जाहिरात दरात १५० टक्के वाढीसाठी बुलढाण्यात व्हॉईस ऑफ मीडियाचे दोन तास धरणे आंदोलन

बुलढाणा,(प्रतिनिधी): “अन्यायकारक धोरणे बदला, अन्यथा वृत्तपत्र उद्योग बंद पडेल!” अशी आक्रमक भूमिका...

श्रद्धांजली: धाडचा ‘देवमाणूस’ हरपला!

सुभाष मोहिते बुलढाणा: ज्या काळात वैद्यकीय क्षेत्रात आधुनिक यंत्रणा नव्हती, फक्त नाडी...