हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा यवतमाळ पोलिसांकडून पर्दाफाश
यवतमाळ, (प्रतिनिधी) : यवतमाळ शहरात गुन्हेगारी हा विषय काही नवीन नाही. मात्र मात्र गेल्या काही महिन्यांपासून पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांनी शहरातील विविध धंद्यांवर छापेमारी सुरू केली आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात यवतमाळ शहर पोलिसांनी शहरातील उच्चभ्रू वस्तीत सुरू असलेल्या एका कुंटणखान्यावर धाड टाकून मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरचा मुख्य एजंट आणि त्याच्या महिला साथीदाराला वेड्या ठोकल्या असून पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे. या कारवाईमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
यवतमाळ शहरातील पिंपळगाव रोडवर “समर्पण” नावाचे अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक दोनमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून अनैतिक व्यवसाय सुरू असून वय वर्ष तिसीतील एक देखणी महिला हा व्यवसाय चालवत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांना मिळाली होती. या रॅकेटचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला फ्लॅटवर पाठवले. तिथे गेल्यानंतर सदर महिला आणि तिचा साथीदार अंकुश रामभाऊ कडू (वय ४० वर्षे) रा. भेंडाळा, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर यांनी ग्राहकासोबत व्यवहार केला. सौदा निश्चित होताच बनावट ग्राहकाने पोलिसांना सिग्नल दिला आणि दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने तातडीने फ्लॅटवर धाड टाकली. घराची पाहणी केली, तेव्हा बेडरूममध्ये यवतमाळचीच एक ३३ वर्षीय पीडित महिला आढळून आली. आरोपी हे तिला पैशांचे आमिष दाखवून किंवा जबरदस्तीने या व्यवसायात ओढत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून रोकड आणि इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश सपकाळ यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अंकुश रामभाऊ कडू आणि सदर महिलेला अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
व्यवसायाचे शेगाव, मलकापूर व बुलढाणा कनेक्शन
हा प्रकार केवळ यवतमाळमधील एका अपार्टमेंटमध्येच सुरू नसून याची पाळेमुळे थेट बुलढाणा जिल्ह्यापर्यंत पोहोचली आहे. यवतमाळ शहरातील काही देखण्या मुली खाजगी वाहनाने शेगाव, मलकापूर आणि बुलढाणा शहरात येऊन या व्यवसायाला चालना देत आहेत, हे विशेष! अत्यंत छुप्या मार्गाने चालणाऱ्या या व्यवसायांविरुद्ध यवतमाळ पाठोपाठ बुलढाणा पोलिसांनी देखील कडक पावले उचलण्याची गरज आहे.

