क्राईम जगत

१६ वर्षाच्या मुलासोबत साठ वर्षीय नराधमाचे गैरकृत्य

अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी) :  वडनेर भोलजी येथील रहिवासी असलेल्या एका ६० वर्षीय वृद्धाने आपल्या नातवाच्या वयाच्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलासोबत अश्लील चाळे त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, नांदुरा पोलिसांनी उपरोक्त आरोपी विरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
औरंगपूर (ता.नांदुरा) येथील रहिवासी असलेला एक सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगा १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.१५ वाजता दरम्यान वडनेर भोलजी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिराजवळ बसलेला होता. त्यावेळी आरोपी सुनील सातव (वय ६० वर्षे) रा. वडनेर भोलजी याने पीडित मुलाला गाठले आणि पीडित मुलाचे दोन्ही हात स्वतःच्या मांडीवर ठेवले. त्याच्या पूर्ण अंगावरून हात फिरवून अत्यंत लज्जास्पद आणि गैरकृत्य केले. घाबरलेल्या मुलाने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. घटनेची माहिती मिळताच वडनेर भोलजी पोलीस चौकीचे पोलीस अंमलदार अजय सुरडकर यांनी घटनास्थळ गाठले.
याप्रकरणी पीडित मुलाच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांत आरोपी सुनील सातव याच्या विरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा-२०१२ चे कलम ८, १२  अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार हे करीत आहेत. ६० वर्षीय व्यक्तीने नातवाच्या वयाच्या मुलासोबत केलेल्या घृणास्पद कृत्यामुळे समाजात नैतिक अध:पतनावर चर्चा सुरू झाली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *