Home स्मार्ट बुलढाणा देवदर्शनाला जाताना काळाचा घाला: एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
स्मार्ट बुलढाणा

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला: एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

चिखली (प्रतिनिधी): छत्रपती संभाजीनगरहून हिंगणघाटच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव एसटी बसने एका दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार संजय पांडुरंग गायकवाड (वय ५८ वर्षे) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी शिला संजय गायकवाड (वय ५० वर्षे) या गंभीर जखमी झाल्या. चिखली-खामगाव महामार्गावर आज २३ फेब्रुवारीच्या सकाळी ही घटना घडली.
केळवद (ता.चिखली) येथील रहिवासी असलेले गायकवाड पती-पत्नी आज २३ फेब्रुवारीच्या सकाळी ९ वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीने जांभोरा येथे देवदर्शनासाठी जात होते. संसाराच्या गाड्यासोबतच भक्तीची ओढ घेऊन निघालेल्या या दांपत्यावर खामगाव-जालना हायवेवरील बेराळा फाट्याजवळ काळाने घाला घातला. समोरून येणाऱ्या संभाजीनगर-हिंगणघाट बस क्रमांक एमएच-४०-वाय-५५४३ ने गायकवाड यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, संजय गायकवाड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी शिला गायकवाड या रस्त्यावर फेकल्या गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमी शिला गायकवाड यांना उपचारासाठी चिखली येथील जवंजाळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच संजय गायकवाड यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. केळवद येथील एका प्रतिष्ठित कुटुंबावर ओढवलेल्या या प्रसंगामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या पती-पत्नीचा असा अपघात झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

स्वंयभू मारोती संस्थानात हनुमान जन्मोउत्सवाची महाप्रसादाने सांगता

बुलढाणा,(प्रतिनिधी): येथील स्वंयभू मारोती संस्थान येथे हनुमान जयंती निमित्त हनुमान जन्मोउत्सवाचे आयोजन...

मोताळा येथे पत्रकारांचे धरणे आंदोलन

मोताळा,(प्रतिनिधी) : पत्रकारांवरील अन्याय थांबविण्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी,...

जिल्हाधिकारी कचेरीवर धडाडला लोकशाहीचा चौथा स्तंभ! जाहिरात दरात १५० टक्के वाढीसाठी बुलढाण्यात व्हॉईस ऑफ मीडियाचे दोन तास धरणे आंदोलन

बुलढाणा,(प्रतिनिधी): “अन्यायकारक धोरणे बदला, अन्यथा वृत्तपत्र उद्योग बंद पडेल!” अशी आक्रमक भूमिका...

श्रद्धांजली: धाडचा ‘देवमाणूस’ हरपला!

सुभाष मोहिते बुलढाणा: ज्या काळात वैद्यकीय क्षेत्रात आधुनिक यंत्रणा नव्हती, फक्त नाडी...