महाराष्ट्र माझा

सावध व्हा! तुमच्या ‘Stop Loss’ वर आहे कोणाची तरी नजर

मुंबई,(प्रतिनिधी): शेअर बाजारात तुम्ही एखादा शेअर खरेदी करता, एक तांत्रिकदृष्ट्या योग्य ‘स्टॉप लॉस’ लावता, पण अचानक मार्केट खाली येते, तुमचा स्टॉप लॉस हिट होतो आणि तिथूनच तो शेअर रॉकेटसारखा वर जातो… असं तुमच्यासोबत वारंवार घडतंय का? जर हो, तर तुम्ही एकटे नाही आहात. भारतीय शेअर बाजारात सध्या ‘अल्गोरिदम हंटिंग’ नावाचा एक अदृश्य खेळ सुरू झाला असून तो सामान्य रिटेल ट्रेडर्सचा खिसा रिकामा करत आहे. त्यामुळे तुम्हाला आताच सावध होण्याची गरज आहे.

पूर्वी ऑपरेटर मॅन्युअली शेअर्सच्या किमती मॅनिप्युलेट करायचे, पण आता हे काम ‘हाय-फ्रीक्वेंसी ट्रेडिंग’ आणि एआयवर आधारित अल्गोज करत आहेत. हे अल्गोज इतके स्मार्ट आहेत की, त्यांना डेटाच्या आधारे हे अचूक माहित असते की हजारो रिटेल ट्रेडर्सनी त्यांचे स्टॉप लॉस नक्की कोणत्या किमतीवर लावले आहेत.

जेव्हा मार्केटमध्ये लिक्विडीटी कमी असते, तेव्हा हे अल्गोज मोठ्या प्रमाणात विक्री करून किंमत मुद्दाम त्या ‘स्टॉप लॉस झोन’ पर्यंत खाली आणतात. तुमचे शेअर्स स्वस्त किमतीत विकले जातात आणि त्याच क्षणी हे मोठे खेळाडू ते शेअर्स विकत घेऊन किंमत पुन्हा वर नेत असल्याचे प्रकार घडत आहे.

अनेकदा ‘ब्रेकआउट’ पाहून ट्रेड घेतल्या जातात. पण, अलीकडच्या काळात ‘फेक ब्रेकआउट्स’चे प्रमाण वाढले आहे. तांत्रिक विश्लेषण करणाऱ्या ट्रेडर्सना आकर्षित करण्यासाठी चार्टवर मुद्दाम केवळ ‘बुलीश’ पॅटर्न तयार केले जात नसून नेमके ट्रेडर्स अडकले की मार्केट रिव्हर्स ही केले जात असल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे शेअर बाजारात आता फक्त चार्ट वाचून चालणार नाही, तर ‘मार्केट सायकॉलॉजी’ आणि मोठ्या खेळाडूंच्या हालचाली समजून घेणे ही काळाची गरज बनली आहे, हे विशेष!

हे आहेत? या अदृश्य शक्तीपासून वाचण्याचे उपाय!

‘राऊंड नंबर्स’ टाळा: बहुतेक लोक ५००, १००० किंवा ४५० अशा राऊंड नंबर्सवर स्टॉप लॉस लावतात. अल्गोजसाठी हे सर्वात सोपे सावज असते. तुमचा स्टॉप लॉस नेहमी अशा किमतीच्या थोडा खाली (उदा. ४९७.६५) ठेवा.

व्होलॅटॅलिटी आधारित स्टॉप लॉस :

केवळ ठराविक टक्केवारीवर स्टॉप लॉस लावण्याऐवजी Average True Range’ इंडिकेटरचा वापर करा. यामुळे मार्केटमधील अस्थिरतेनुसार तुम्हाला सुरक्षित अंतर राखता येईल.

‘बफर झोन’ ठेवा: तुमच्या तांत्रिक सपोर्ट लेव्हलच्या अगदी जवळ स्टॉप लॉस लावू नका. त्या लेव्हलच्या खाली थोडा ‘बफर’ सोडा, जेणेकरून किरकोळ चढ-उतारामुळे तुम्ही बाहेर पडणार नाही.

ऑर्डर फ्लो आणि व्हॉल्यूम तपासा: फक्त मेणबत्त्या पाहू नका. त्या किमतीला खरोखर किती व्हॉल्यूम आहे हे तपासा. जर किंमत पडत असताना व्हॉल्यूम कमी असेल, तर समजून जा की हे केवळ ‘स्टॉप लॉस हंटिंग’ असू शकते.

मानसिक शिस्त: मार्केटमध्ये शिरण्यापूर्वीच तुमचा तोटा निश्चित करा. जर वारंवार स्टॉप लॉस हिट होत असतील, तर त्या दिवशी ट्रेडिंग थांबवा. मार्केटशी ‘बदला’ घेण्याच्या नादात मोठे नुकसान करून घेऊ नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *