Home क्राईम जगत कौटुंबिक वादातून विवाहितेसह मेहुण्याला मारहाण
क्राईम जगत

कौटुंबिक वादातून विवाहितेसह मेहुण्याला मारहाण

अजय टप

मलकापूर, (प्रतिनिधी) : मोताळा तालुक्यातील कुऱ्हा येथे एक २१ वर्षीय विवाहिता आपल्या मुलीचे कपडे घेण्यासाठी सासरी गेल्याच्या कारणावरून पतीने तिला आणि तिच्यासोबत आलेल्या मेहुण्याला बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच समोर आली. याप्रकरणी धामणगाव बढे पोलिसांनी पती सावन सुरेश नोळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

रेश्मा सावन नोळे (वय २१ वर्षे) आणि आरोपी सावन सुरेश नोळे हे पती-पत्नी असून ते कुऱ्हा (ता.मोताळा) येथील रहिवासी आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये पटत नसल्याने रेश्मा ही आपल्या माहेरी आई-वडिलांकडे राहत होती. ८ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास रेश्मा ही आपल्या बहिणीचा मुलगा साहिल डांगे याच्यासोबत मोटारसायकलवर बसून आपल्या मुलीचे कपडे आणण्यासाठी सासरी (कुऱ्हा) येथे गेली होती. यावेळी तिचा पती सावन सुरेश नोळे हा घरातच हजर होता. रेश्माला पाहताच सावनचा राग अनावर झाला आणि त्याने “तू कशाला आलीस?” असे म्हणत तिला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रेश्माने पतीला मुलीचे कपडे घेऊन जाऊ देण्याची विनंती केली असता, पतीने “तू येथे राहू नको, येथून निघून जा” असे म्हणत तिला घरातून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. आरोपीने रेश्माला लोटपाट करून चापट-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी रेश्माची सुटका करण्यासाठी तिचा मेहुणा साहिल डांगे हा मध्ये पडला असता, आरोपी सावनने हातातील काठीने साहिलला मारहाण केली. तसेच जर तू पुन्हा येथे आलीस, तर तुला जीवे मारून टाकीन,” अशी धमकी दिली.

या प्रकरणी रेश्मा नोळे यांनी धामणगाव बढे पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सावन सुरेश नोळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार शरद बाठे हे करत आहेत.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

जागतिक वारसास्थळ ‘अजिंठा’ परिसरात देहविक्रीचा विळखा

अभिनय बोर्डे धाड, (प्रतिनिधी): जगाच्या नकाशावर आपल्या लेण्यांसाठी आणि कलेसाठी प्रसिद्ध असलेले...

३ लाखांच्या मुद्देमालासह आरोपी २४ तासांत गजाआड

खामगाव,(प्रतिनिधी):हॉटेल मालक घरी अंघोळीला गेल्याची संधी साधून हॉटेलमधील लॅपटॉप, टॅब आणि कार...

बुलढाणा जिल्हा हादरला! अवघ्या २४ तासांत पुन्हा ५ जण गायब

अजय टप मलकापूर,(प्रतिनिधी): शांतता आणि सुव्यवस्थेसाठी ओळखल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन...

खळबळजनक: ‘तू मला पसंत नाहीस, मला दुसरं लग्न करायचंय’

अजय टप  शेगाव,(प्रतिनिधी): भारतीय संस्कृतीत लग्नाला पवित्र बंधन मानले जाते, मात्र याच...