Home स्मार्ट बुलढाणा व्हॉईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अनिल म्हस्के
स्मार्ट बुलढाणा

व्हॉईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अनिल म्हस्के

बुलडाणा, दि.१६ (प्रतिनिधी): जगातील ४५ देशांमध्ये कार्यरत असलेली पत्रकारांची एकमेव आणि सर्वात मोठी संघटना असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी दैं. ‘पुण्यनगरी’चे आवृत्ती संपादक तथा मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याचे भूमीपूत्र अनिल म्हस्के यांनी निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेल्या आहे. बुलडाणा जिल्ह्याच्या पत्रकारितेच्या इतिहासातील सुवर्ण क्षण म्हणून या नियुक्तीची नोंद झाली आहे.१५ मार्च रोजी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्यासह राष्ट्रीय कोअर कमिटीने अनिल म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत या नियुक्तीची घोषणा केली.

पत्रकारितेच्या क्षेत्रात अनिल म्हस्के गेल्या ३० वर्षांपासून कार्यरत आहेत. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्षम्हणून त्यांची कामगिरी अत्यंत प्रभावी आणि उल्लेखनिय ठरली होती. व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेच्या स्थापनेनंतर प्रारंभीच २ ऑकटोबर २०२२ रोजी अनिल म्हस्के यांच्याकडे विदर्भ विभागीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. या नियुक्तीनंतर त्यांनी अल्पावधीत संपूर्ण विदर्भात संघटनेचा विस्तार केला. त्यांच्या कामाची धडाडी पाहता वर्षभरातच म्हणजे १० मार्च २०२३ रोजी अनिल म्हस्के यांच्यावर बारामती येथे झालेल्या अधिवेशनात प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पत्रकार आणि पत्रकारितेसाठी लढणाऱ्या व्हाईस ऑफ मीडियाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. आपल्या संघटन कौशल्याने त्यांनी राज्यभरात संघटनेचा झपाट्याने विस्तार केला. पत्रकारांची आरोग्य तपासणी, पत्रकारांचा विमा उतरविणे, पत्रकारांना आर्थिक सहाय्य, पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप अशा विविध कल्याणकारी योजना त्यांनी राबविल्या. पत्रकारांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी आंदोलने आखली आणि राज्यात विविध आंदोलनाचे नेतृत्व केले. श्री. म्हस्के यांच्या पुढाकारातूनच पत्रकारांसाठी आर्थिक विकास महामंडळाची मागणी समोर आली, या मागणीचा देखील त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला म्हणून राज्य शासनाने या महामंडळाला मान्यता दिली हे विशेष यश. त्यांच्या नेतृत्वात व्हाईस ऑफ मीडियाची राज्यपातळीवरील ३ अधिवेशन प्रचंड यशस्वी झाली. गेल्या काही दिवसांपासून व्हाईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेत नव्याने राष्ट्रीय अध्यक्षाची निवडणूक घेण्याची चर्चा सुरू होती. संस्थापक अध्यक्ष संदीप काळे आणि राष्ट्रीय कोअर कमिटीत याविषयी अनेक बैठका झाल्या. देशभरातील राज्य अध्यक्षांची मते जाणून घेण्यात आली. त्यानंतर अनिल म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. १५ मार्च रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात व्हाईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अनिल म्हस्के यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली. यावेळी राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा. व्हाईस ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, वरिष्ठ पत्रकार तथा संघटनेचे केंद्रीय संचालक चंद्रमोहन पूप्पाला , शेतकरी नेते रविकांत तुपकर, संपादक प्रसन्न जोशी, विशाल पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

स्वंयभू मारोती संस्थानात हनुमान जन्मोउत्सवाची महाप्रसादाने सांगता

बुलढाणा,(प्रतिनिधी): येथील स्वंयभू मारोती संस्थान येथे हनुमान जयंती निमित्त हनुमान जन्मोउत्सवाचे आयोजन...

मोताळा येथे पत्रकारांचे धरणे आंदोलन

मोताळा,(प्रतिनिधी) : पत्रकारांवरील अन्याय थांबविण्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी,...

जिल्हाधिकारी कचेरीवर धडाडला लोकशाहीचा चौथा स्तंभ! जाहिरात दरात १५० टक्के वाढीसाठी बुलढाण्यात व्हॉईस ऑफ मीडियाचे दोन तास धरणे आंदोलन

बुलढाणा,(प्रतिनिधी): “अन्यायकारक धोरणे बदला, अन्यथा वृत्तपत्र उद्योग बंद पडेल!” अशी आक्रमक भूमिका...

श्रद्धांजली: धाडचा ‘देवमाणूस’ हरपला!

सुभाष मोहिते बुलढाणा: ज्या काळात वैद्यकीय क्षेत्रात आधुनिक यंत्रणा नव्हती, फक्त नाडी...