Home स्मार्ट बुलढाणा चिखलीत चैत्र पाडवा पहाट : गुढीपाडव्याला रंगणार सुरांची मैफल… “हे सुरांनो चंद्र व्हा”
स्मार्ट बुलढाणा

चिखलीत चैत्र पाडवा पहाट : गुढीपाडव्याला रंगणार सुरांची मैफल… “हे सुरांनो चंद्र व्हा”

चिखली,(प्रतिनिधी):येथील प्रतिथयश इरतकर सर यांच्या विवेकानंद शिकवणी वर्गाच्या माजी विद्यार्थ्यांच्या सहभागातून मागील एकोणवीस वर्षांपासून सादर होत असलेला ‘चैत्र पाडवा पहाट’ हा प्रभात संगीत सोहळा यंदा २० व्या वर्षात पदार्पण करत असून, गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पुन्हा एकदा सुरेल मैफलीने रसिकांना मंत्रमुग्ध करण्यास सज्ज झाला आहे.

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित या संगीत सोहळ्यामागे शास्त्रीय, सुगम, भक्ती, लोकगीते आणि भावगीतांच्या माध्यमातून घराघरात संगीताची गोडी निर्माण व्हावी, हा मुख्य उद्देश आहे. गेल्या दोन दशकांत या व्यासपीठावर महाराष्ट्रातील अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या कलेची जादू सादर केली आहे. महागायिका वैशाली म्हैसने-माडे, यज्ञेश्वर निंबेकर, पं. बाळासाहेब वाईकर, ‘गौरव महाराष्ट्राचा’ विजेती धनश्री देशमांडे, पं. संजय गरुड आदी नामवंत कलाकारांनी या सोहळ्याची शोभा वाढवली आहे.

यंदाच्या वर्षी, गुरुवार दि. १९ मार्च रोजी गुढीपाडव्याच्या निमित्ताने अकोल्याचे डॉ. निरज लांडे व त्यांचा संच ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ हा विशेष संगीत कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमात भक्ती संगीत, भावसंगीत, लोकगीते, चित्रपट संगीत तसेच ‘राग एक गाणी अनेक’ अशा विविध रंगांनी नटलेली मैफल रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रसिद्ध गायक तथा निवेदक डॉ.नाना भडके करणार आहेत.

हा भव्य सोहळा गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे ४.३० वाजता चिखली येथील एस.पी.एम. महाविद्यालयाच्या विस्तीर्ण प्रांगणात पार पडणार आहे. या सुरेल पहाटेचा आनंद घेण्यासाठी सर्व संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भागवत इरतकर यांनी केले आहे. विशेष म्हणजे, २०२६ सालचा गुढीपाडवा हा या संगीत सोहळ्याचा २० वा टप्पा ठरत असून, पुढील वर्षांत २१ वे पुष्प पूर्ण करून ही परंपरा नव्या पिढीकडे सोपविण्याचा मानस भागवत इरतकर यांनी व्यक्त केला आहे. या उपक्रमासाठी माजी विद्यार्थी आणि रसिकांचे मोलाचे सहकार्य लाभत असून, यंदाही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन या सांस्कृतिक परंपरेला अधिक बळ द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

गुढीपाडव्याच्या मंगलमय वातावरणात रंगणारी ‘चैत्र पाडवा पहाट’ ही सुरेल मैफल चिखलीकरांसाठी एक अविस्मरणीय सांस्कृतिक पर्व ठरणार आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

स्मार्ट बुलढाणा

स्वंयभू मारोती संस्थानात हनुमान जन्मोउत्सवाची महाप्रसादाने सांगता

बुलढाणा,(प्रतिनिधी): येथील स्वंयभू मारोती संस्थान येथे हनुमान जयंती निमित्त हनुमान जन्मोउत्सवाचे आयोजन...

स्मार्ट बुलढाणा

मोताळा येथे पत्रकारांचे धरणे आंदोलन

मोताळा,(प्रतिनिधी) : पत्रकारांवरील अन्याय थांबविण्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी,...

स्मार्ट बुलढाणा

जिल्हाधिकारी कचेरीवर धडाडला लोकशाहीचा चौथा स्तंभ! जाहिरात दरात १५० टक्के वाढीसाठी बुलढाण्यात व्हॉईस ऑफ मीडियाचे दोन तास धरणे आंदोलन

बुलढाणा,(प्रतिनिधी): “अन्यायकारक धोरणे बदला, अन्यथा वृत्तपत्र उद्योग बंद पडेल!” अशी आक्रमक भूमिका...

स्मार्ट बुलढाणा

श्रद्धांजली: धाडचा ‘देवमाणूस’ हरपला!

सुभाष मोहिते बुलढाणा: ज्या काळात वैद्यकीय क्षेत्रात आधुनिक यंत्रणा नव्हती, फक्त नाडी...