अभिनय बोर्डे
धाड,(प्रतिनिधी): चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवत म्हसला बुद्रुक येथील मतिमंद निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले. केवळ अन्नदानच नव्हे, तर याप्रसंगी सव्वा क्विंटल धान्य देखील विद्यालयाला भेट देण्यात आले.

भाजपा धाड ग्रामीण मंडळातील व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष किरण सरोदे, व्हिजेएनटी जिल्हाध्यक्ष योगेश राजपूत, युवानेते गणेश बाजी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विशाल विसपुते व युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रदीप टाकसाळ यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २७ मार्च रोजी आयोजित या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी मतिमंद विद्यार्थ्यांसोबत बसून स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. आमदारांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही डामडौल न करता सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष देविदास पाटील जाधव, व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष तथा पुण्यनगरीचे उपसंपादक वैभवराजे मोहिते, धाड ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष अनिल जाधव, जिल्हा चिटणीस विष्णू वाघ, सांस्कृतिक आघाडी तालुकाध्यक्ष अरुण भोंडे, तालुका उपाध्यक्ष विलास पालकर व गजानन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांसोबत तासभर हितगुज करुन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले. यावेळी प्रदीप देशपांडे, देविदास देशमुख, अनिल फेपाळे, बबन फेपाळे, राजू पालकर, गणेश फेपाळे, अनिल अपार, सतीश भोंडे, भागवत पालकर, योगेश राऊत, राहुल उगले, प्रहरचे ऋषी वाघ, भैय्या परदेसी, सोनू वाघ, दिपक ब्राह्मणे आणि गणेश जाधव यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पवन कायस्थ, शंकर शिंदे, सोनू तायडे, सतीश नरवाडे, शैलेश राजपूत, विशाल गिरी, विशाल वाघमारे आणि सुरत चंदनसे यांनी विशेष परिश्रम घेतले. या सामाजिक उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष शिवनारायणजी पोपळकर, मुख्याध्यापक भिका पोपळकर, कर्मचारी राजेंद्र पोपळकर, प्रेम गोरे आणि उमेश परमेश्वर यांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave a comment